'35 दहशतवाद्यांचे शव आम्ही पाहिले, पाक सैन्यानं हिसकावले लोकांचे मोबाइल'

'35 दहशतवाद्यांचे शव आम्ही पाहिले, पाक सैन्यानं हिसकावले लोकांचे मोबाइल'

''दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'विरोधात भारताने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईच्या तासाभरानंतर घटनास्थळावरून जवळपास 35 दहशतवाद्यांचे शव अॅम्ब्युलन्सनं बाहेर आणण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यात काम केलेल्यांचाही समावेश होता''

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुदलाच्या विमानांनी 26 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास पाकिस्तानवर 'एअर स्ट्राईक' केला. या कारवाईद्वारे जवानांनी मोठ्या प्रमाणात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान आता पूर्णतः बिथरला आहे. या कारवाईसंदर्भात वेगवेगळ्या अफवा निर्माण करून पाकिस्तानकडून वारंवार दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, एअर स्ट्राईकच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. अशी माहिती 'फर्स्टपोस्ट' या वेबसाईटकडून देण्यात आली आहे.

'दहशतवाद्यांचे शव नेताना आम्ही पाहिले'

''दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'विरोधात भारताने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईच्या तासाभरानंतर घटनास्थळावरून जवळपास 35 दहशतवाद्यांचे शव अॅम्ब्युलन्सनं बाहेर आणण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यात काम केलेल्यांचाही समावेश होता'', अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

तर, बॉम्बने उडवण्यात आलेल्या झोपडीमध्ये फिदायीन हल्ल्याचे प्रशिक्षण घेतलेले 'जैश-ए-मोहम्मद'चे 12 दहशतवादी झोपले होते, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या या विश्वसनीय सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन ही माहिती दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, 'कारवाईनंतर स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पाकिस्तानी सैन्याकडून हा परिसर बंद करण्यात आला होता. पोलिसांनाही घटनास्थळावर जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. तसंच, पाकिस्तानी सैन्यानं वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून मोबाइल फोनदेखील हिसकावून घेतल्याचे आम्ही पाहिले'.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये कर्नल सलीम मारला गेला. सलीम हा माजी पाकिस्तानी इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स अधिकारी होता. जैश-ए-मोहम्मदचा ट्रेनर मुफ्ती मोईन आणि विस्फोटक उपकरण बनवणार उस्मान गनीचाही यात खात्मा झाला. तर कर्नल जार झाकिरी हा जखमी झाला होता. एकूणच प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा खोटारटेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


Special Report : सेनेच्या बालेकिल्ल्यात कोण लावणार सुरुंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या