मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्त्रीचे अनैतिक संबंध असले म्हणून ती चांगली आई नाही असं नव्हे - हायकोर्ट

स्त्रीचे अनैतिक संबंध असले म्हणून ती चांगली आई नाही असं नव्हे - हायकोर्ट

आपल्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध (extra martial affair verdict) आहेत, त्यामुळं तिच्याकडं मुलीचा सांभाळ करण्यास देऊ नये, असा दावा केला मात्र यावर न्यायालयानं पतीने केलेला दावा फेटाळून लावला.

आपल्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध (extra martial affair verdict) आहेत, त्यामुळं तिच्याकडं मुलीचा सांभाळ करण्यास देऊ नये, असा दावा केला मात्र यावर न्यायालयानं पतीने केलेला दावा फेटाळून लावला.

आपल्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध (extra martial affair verdict) आहेत, त्यामुळं तिच्याकडं मुलीचा सांभाळ करण्यास देऊ नये, असा दावा केला मात्र यावर न्यायालयानं पतीने केलेला दावा फेटाळून लावला.

    नवी दिल्ली, 2 जून : आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीचा सांभाळ करण्याची मागणी करणारी याचिका महिलेनं न्यायालयात दाखल केली होती. यावर तिच्या पतीनं न्यायालयात दावा केला की, आपल्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध (extra martial affair verdict) आहेत, त्यामुळं तिच्याकडं मुलीचा सांभाळ करण्यास देऊ नये. यावर न्यायालयानं पतीने केलेला दावा फेटाळून लावत, अनैतिक संबंध असले म्हणून ती एक चांगली आई होऊ शकत नाही, असे म्हणता येणार नाही, असा निर्वाळा दिला. हा निवाडा पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने (Punjab High Court) एका खटल्यामध्ये दिला आहे. महिलेचे अनैतिक संबंध जरी असले तरी ती एक चांगली आई बनू शकणार नाही, असे आपल्याला म्हणता येणार नाही, असे न्यायालयानं सांगत द हिंदू मायनॉरिटी अँड गार्जियनशिप अक्ट 1956 च्या कलम 6 नुसार वयवर्षे 5 पर्यंतच्या मुलांसाठी त्यांची आईच नॅचरल गार्डियन असेल, असा निर्णय न्यायालयानं दिला. 5 वर्षांपर्यंतच्या बाळाला सर्वात जास्त त्याच्या आईची गरज असते. या काळात त्यांच्या देखभालीसाठी आईच महत्त्वाची आहे. या काळात बाळाला आईपासून दूर ठेवणे योग्य होणार नाही. कोणताही पुरुष अथवा स्त्री एकटेही मुलाची देखभाल नीट करू शकतात, अशी भरपूर उदाहरणे देशात आहेत, असंही न्यायालयाने सांगितलं. आपल्या पतीपासून विभक्त झालेली एक महिला सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे. तिनं आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीचा सांभाळ करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपण पतीपासून वेगळे झालो आहोत, सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहोत आणि आर्थिक परिस्थिती चांगली असून मी माझ्या मुलीचा सांभाळ योग्य पद्धतीनं करू शकते, त्यामुळे तिचा ताबा मला द्यावा, अशी विनंती तिनं न्यायालयात केली होती. हे वाचा- अनिल परबांच्या अडचणीत वाढ? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रत्नागिरीतील रिसॉर्टसंदर्भात चौकशी सुरू यावर तिच्या पतीने विरोध दर्शवत न्यायालयात दावा केला की, पत्नीचे तिच्या नात्यातील कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत. ती चांगल्या चारित्र्याची स्त्री नाही. त्यामुळं ती एक चांगली आई बनू शकणार नाही आणि त्याचा मुलीच्या जीवनावरही विपरीत परिणाम होईल. मात्र, त्यांनी केलेल्या दाव्याचे ते कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करू शकले नाहीत. त्यामुळं न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून शेवटी आईकडे मुलीला देण्याचा निर्णय दिला. या घटनेतील मुलीचा जन्म 27 जून 2017 रोजी झाला होता. त्यावेळी हे दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते. त्यानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध आणि इतर गोष्टींवरून वाद होत केले आणि अखेर त्यांनी वेगळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Court, High Court, Marriage

    पुढील बातम्या