क्रेडिट कार्डमुळं संपलं पतीचं 'क्रेडिट', 'गर्लफ्रेंड'सोबत मौज केल्याचं झालं उघड

क्रेडिट कार्डमुळं संपलं पतीचं 'क्रेडिट', 'गर्लफ्रेंड'सोबत मौज केल्याचं झालं उघड

'तीनच दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीला खोट बोलून पती आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये मौज करत होता.'

  • Share this:

अहमदाबाद 25 जुलै : क्रेडिट कार्ड बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं पण नवीनच लग्न झालेल्या पतीला क्रेडिट कार्डचा वापर चांगलाच महागात पडलाय. लग्नानंतर तीनच दिवसांनी पत्नीशी खोट बोलून पती आपल्या गर्लफ्रेंड सोबत मौज करत असल्याचं पत्नीला कार्डच्या बीलावरून समजलं आणि तिचा संताप झाला. सासरच्या लोकांनीही तिला त्रास द्यायला सुरुवात केल्याने फसवल्या गेलेल्या पत्नीने अखेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलीय.

‘सेक्स’वर बोलणार सोनाक्षी सिन्हा, ट्विटरवर शेअर केला नंबर

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एका चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचं धुमधडाक्यात लग्न झालं. लग्नानंतर तीनच दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचं आहे असं पत्नीला खोटं सांगून तो शहरातल्याच एका पॉश हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत थांबला होता. हॉटेलमध्ये थांबून त्यांने मैत्रिणीसोबत मौज मजा केली आणि तो घरी परतला.

नंतर काही दिवसांनी पत्नीने पतीच्या क्रेडिट कार्डचं बील तपासलं असता त्यात अहमदाबादमधल्या एका हॉटेलच्या पेमेंटची नोंद आढळली. तिला पतीच्या हालचालीविषयी शंका आल्याने तीने आपल्या भावाला माहिती काढायला सांगितली. भावने जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्याला धक्काच बसला. ज्या बहिणीचं लग्न काही दिवसांपूर्वीच झालं होतं तीचा नवरा आपल्या गर्लफ्रेंडसोबत या हॉटेलमध्ये राहिल्याचं त्याला आढळून आलं.

संजू सिनेमातल्या '300 मुलींसोबत सेक्स'चा डायलॉग तुम्हाला चालतो, शाहिदची सटकली

हा प्रकार समजल्याने नव्यानेच लग्न झालेल्या मुलीलाही जबर धक्का बसला. तिच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं तिला वाटलं. नवऱ्याने फसवणूक केल्याचं तिने तिच्या सासरच्या मंडळींना सांगितलं. तेव्हा घरच्या मंडळींना मुलाला जाब न विचारता तिलाच छळायला सुरुवात केली आणि तिच्यावर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणला. न्याय मिळत नसल्याने शेवटी तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आता पोलीस पुढचा तपास करत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 25, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading