31 आॅगस्ट : जर तुम्ही आतापर्यंत पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण आता पॅन कार्ड आधारकाॅर्डशी जोडण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्राप्तीकर विभागाने पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मागील महिन्यात याची डेडलाईन वाढवण्यात आली होती. अनेक पॅनकार्ड वापरकर्त्यांची नावं आधार कार्डशी जुळत नसल्यामुळे लिंक होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे पॅनकार्ड आधारकार्डसोबत जोडण्यासाठी मुदत वाढवली होती. त्यामुळे आज 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे.
का गरजेचं आहे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे ?
देशात काळा पैशाला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत काळा पैशाची चोरी थांबण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. शासकीय योजना, सबसिडी आणि इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.
31 डिसेंबरपर्यंत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड जोडण्याची डेडलाईन सरकारने 31 डिसेंबरपर्यंत केली आहे. याआधीही डेडलाईन 30 सप्टेंबर होती. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही आधारकार्डशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा