• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भयंकर! खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट; आगीमध्ये तरुण गंभीर जखमी

भयंकर! खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट; आगीमध्ये तरुण गंभीर जखमी

एका तरुणाच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट (mobile blast) झाला. त्या स्फोटात तो गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 • Share this:
  लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश), 18 मार्च : मोबाईलचा (Mobile) वापर करणाऱ्या सर्वांच्याच काळजीमध्ये भर टाकाणारी  बातमी आहे. एका तरुणाच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट (mobile blast) झाला. त्या स्फोटात तो गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने काही दिवसांपूर्वीच मोबाईल विकत घेतला होता, अशी माहिती आहे. नेमकं काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील ही भयंकर घटना आहे. कुलवंत सिंह असं मोबाईलच्या स्फोटात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो रानीगंज गावातील रहिवाशी आहे. या तरुणाने इंटेल (Intel) या कंपनीचा मोबाईल पँटच्या खिशात ठेवला होता. अचानक त्याचा स्फोट झाला आणि त्याला काही कळण्याच्या आतमध्येच त्याच्या पँटला आग लागली. यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या स्फोटामुळे घाबरलेल्या कुलवंतने गडबडीत मोबाईल खिशातून काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा हात आणि पाय आगीमध्ये जळाले. कुलवंतला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. (हे वाचा- संशयाची पाल चुकचुकली! पत्नीची कात्रीनं गळा चिरुन हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा) 'आपण काही दिवसांपूर्वीच इंटेल कंपनीचा मोबाईल विकत घेतला होता. तो वापरण्यास सुरुवात केली होती आणि अचानक त्याचा स्फोट झाला,' अशी माहिती कुलवंतने दिली. या घटनेनंतर कुलवंतच्या गावात खळबळ उडाली असून मोबाईल धारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
  Published by:News18 Desk
  First published: