फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 ठार तर 20 जण आगीत अडकले

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 ठार तर 20 जण आगीत अडकले

मोदीनगरात एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग पसरली आहे.

  • Share this:

गाझियाबाद, 5 जुलै: उत्तर प्रदेशमधील मोदीनगरात एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग पसरली आहे. स्फोटात  7 कामगारांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीररित्या होरपळले आहे. आगीत 20 कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे.  बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मोठे परिश्रम घेत आग नियंत्रणात आणली आहे.  आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही.

हेही वाचा...भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण

मिळालेली माहिती अशी की,  रविवारी (5 जुलै) दुपारी बखरवा गावातील फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला. नंतर काही क्षणात आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि भीषण आग संपूर्ण कारखान्यात पसरली. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात महिला काम करतात. कारखान्यात बर्थडे पार्टीत वापरली जाणारी फुलजारी तयार करण्याचं काम सुरु होतं. त्याच वेळी अचानक मोठा स्फोट झाला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.  स्थानिक नागरिकांनी मोठं धाडस करत 10 कामगारांना तातडीनं बाहेर काढलं. मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे.  सध्या प्रशासन पीडितांची ओळख पटवण्यात आणि मदतकार्यात गुंतलं आहे.

बेकायदा सुरू होता कारखाना...

स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, मोदीनगर येथे फटाक्याचा कारखाना बेकायदेशीरपणे सुरू होता. मात्र, यावृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

हेही वाचा...बारामतीत मोठी कारवाई! पत्त्याच्या क्लबवर छापा, 33 जणांना अटक, लाखोंचा ऐवज जप्त

तरच मृतदेह ताब्यात घेऊ...

घटनास्थळी एसपी देहात नीरज जादौन, आमदार डॉ. मंजू शिवाच आणि भाजपचे जिलाध्‍यक्ष दिनेश सिंघल पोहोचले आहेत. मात्र, त्यांना स्थानिक नागरिकांनी घेराव घातला आहे. मालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेऊ देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्यासाठी आंदोलन करत आहेत. सध्या घटनास्थळी गोंधळ सुरू आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

First published: July 5, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या