Home /News /national /

थंडीच्या दिवसांत पडतोय पाऊस; काय आहे कारण आणि त्याचा परिणाम काय होणार?

थंडीच्या दिवसांत पडतोय पाऊस; काय आहे कारण आणि त्याचा परिणाम काय होणार?

कमी दाबाचा पट्टा दरवर्षी असतो, पण तो उत्तरेला सीमित राहतो. हिमालयामुळे अडला जातो आणि या ठिकाणी जमलेल्या ढगांमुळे बर्फवृष्टी होते.

    मुंबई, 4 जानेवारी :महाराष्ट्रासह देशभरात अनेक राज्यांमध्ये ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण आहे. देशातलं रेकॉर्ड पाहता गेल्या 13 वर्षांतलं जानेवारीच्या पावसाचं रेकॉर्ड यंदा मोडलं आहे. हिवाळ्यातल्या या पावसामागे काय कारण आहे? संपूर्ण भारतीय द्वीपकल्पावर निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस सध्या पडत आहे. उत्तर भारतात याचा परिणाम जास्त आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत. पश्चिमेकडचे वारे (western disturbances) यामागचं कारण आहे. कमी दाबाचा पट्टा दरवर्षी असतो, पण तो उत्तरेला सीमित राहतो. हिमालयामुळे अडला जातो आणि या ठिकाणी जमलेल्या ढगांमुळे बर्फवृष्टी होते. हिवाळ्यातला पाऊस आणि हिमवर्षाव तिथे सर्वसाधारण आहे. पण आता याचा परिणाम दक्षिणेपर्यंत पसरल्याने चिंता वाढली आहे. ला लीनाच्या प्रभावामुळे हा पाऊस पडत असून यावर्षी याचमुळे उत्तरेकडे थंडी देखील मोठ्या प्रमाणात पडणार आहे. मार्चपर्यंत ही थंडी लांबणार असून यामुळे आगामी काळात देखील हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दहा लोकांचं अन्न फस्त करणाऱ्या जगातल्या सर्वात लठ्ठ व्यक्तीचं झालं निधन प्रशांत महासागरात (Pacific Ocean) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ला नीना परिस्थिती निर्माण होते. पूर्वेकडून खूप वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण होते. यामध्ये समुद्राचे तळाचे तापमान खूप कमी होते. जगभरातील तापमानावर याचा प्रभाव पडतो. western disturbances चा परिणाम सर्वसाधारणपणे उत्तर भारतालाच बसतो. महाराष्ट्रापर्यंत यंदा याचे परिणाम दिसत असल्याने याचा मोठा फटका याकाळात रब्बीच्या पिकांना बसतो आहे. गहू आणि हरभऱ्याच्या पिकांना याचा मोठा फटका बसतो. मनाचा मोठेपणा! म्हणून हॉटेलमध्ये ग्राहकाने दिली 2020 डॉलरची टीप यंदा थंडीही कडाक्याची पडणार असं म्हणतात. पण कडाक्याची थंडी म्हणजे काय तर सरासरीपेक्षा तापमान 6 ते 7 अंशाने खाली आलं तर याला कडाक्याची थंडी म्हणतात. उत्तर भारतात तसा अंदाज असला, तरी महाराष्ट्रात तसा कडाका जाणवणार नाही.
    First published:

    पुढील बातम्या