मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना महासाथीला रोखण्यात भारत अव्वल; मोदी सरकारचा ACTION PLAN ठरतोय यशस्वी

कोरोना महासाथीला रोखण्यात भारत अव्वल; मोदी सरकारचा ACTION PLAN ठरतोय यशस्वी

या संपूर्ण काळात शास्रीय सल्ल्यानुसार बचाव कसा करायचा याचं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) केलं. त्यामुळे आज भारत ज्या स्थितीत आहे तिथपर्यंत पोहोचू शकला. विकसित देशांच्या तुलनेतही आपण सध्या खूप चांगल्या परिस्थितीत आहोत.

या संपूर्ण काळात शास्रीय सल्ल्यानुसार बचाव कसा करायचा याचं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) केलं. त्यामुळे आज भारत ज्या स्थितीत आहे तिथपर्यंत पोहोचू शकला. विकसित देशांच्या तुलनेतही आपण सध्या खूप चांगल्या परिस्थितीत आहोत.

या संपूर्ण काळात शास्रीय सल्ल्यानुसार बचाव कसा करायचा याचं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) केलं. त्यामुळे आज भारत ज्या स्थितीत आहे तिथपर्यंत पोहोचू शकला. विकसित देशांच्या तुलनेतही आपण सध्या खूप चांगल्या परिस्थितीत आहोत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरस (coronavirus) प्रकरणाच्या 28 नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या आकडेवारीचा आढावा घ्यायचा झाल्यास भारतात (coronavirus in india) आतापर्यंत प्रत्येकी दहा लाख लोकसंख्येमागे 6731 कोरोनाबाधित रुग्ण असून 98 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण अनुक्रमे अमेरिकेत 40 हजार आणि 813, ब्रिटनमध्ये 23 हजार 361 आणि 846, फ्रान्समध्ये 33 हजार 424 आणि 780, ब्राझीलमध्ये 29 हजार 129 आणि 805 तर इटलीमध्ये 25 हजार 456 आणि 888 इतकी आहे. भारताच्या तुलनेत या देशांतील मृत्यूंची संख्या 8 ते 9 पट आहे. भारतात सप्टेंबर मध्यात दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या 97 हजार 894 वरून 26 नोव्हेंबरला 43 हजार 174 वर आली आहे.

यूएस, यूकेसारख्या विकसित आणि इतर कोरोना प्रभावित देशांपेक्षाही भारताची परिस्थिती किती सुधारली आहे, ही आकडेवारी याचा पुरावा आणि याचं श्रेय जातं ते मोदी सरकारला. या संपूर्ण काळात शास्रीय सल्ल्यानुसार बचाव कसा करायचा याचं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांनी केलं त्यामुळे आज भारत ज्या स्थितीत आहे तिथपर्यंत पोहोचू शकला. विकसित देशांच्या तुलनेतही आपण सध्या खूप चांगल्या परिस्थितीत आहोत.

चीनमध्ये (china) वुहानचा (wuhan) उद्रेक झाल्यानंतर 17 जानेवारी 2020 ला भारताने आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू केली आणि 30 जानेवारीला देशातला पहिला कोव्हिड-19 बाधित रुग्ण सापडला होता. भारताने तातडीने कंन्टेटमेन्ट झोन आणि तपासण्या सुरू केल्या. रॅपिड अँटिजेन आरटी-पीसीआर चाचण्या करणाऱ्या जगातील पहिल्या काही देशांमधील एक देश भारत होता. पहिल्यांदा भारतानं उचलेलल्या या पावलांवर टीकाही झाली पण नंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) या पद्धतीचा स्वीकार केला. एप्रिल महिन्यात कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं जून महिन्यात सर्वांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं.

मोठं संक्रमण टाळण्यासाठी लवकर लॉकडाऊन

मार्च महिन्यात नवे रुग्ण सापडण्याचा दर एका आठवड्यात 10 चा 19 टक्के झाला आणि तीन दिवसात रुग्णसंख्या दुप्पट व्हायला लागली. त्यामुळे 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेच्या हितासाठी देशभर लॉकडाउन जाहीर केला. भारतानं इतर देशांच्या तुलनेत खूप लवकर देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. जर त्याला उशीर झाला असता तर भारतातील रुग्णसंख्या युरोपीय देश आणि अमेरिकेपेक्षा अधिक झाली असती.

हे वाचा - पंतप्रधान मोदींची 'भारत बायोटेक'ला भेट, Corona Vaccine वर केली चर्चा

लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारनं 15,362 कोव्हिड रुग्णालयं, 15.40 लाख आयसोलेशन बेड, 2.70 लाख ऑक्सिजन सुविधा असलेले बेड्स आणि 78 हजार आयसीयू बेड्स या सुविधा उभारल्या. देशभरातल्या सरकारी हॉस्पिटल्सना 32 हजार व्हेंटिलेटर देण्यात आले. गेल्या 70 वर्षआंत सरकारी हॉस्पिटल्समध्ये केवळ 12 हजार व्हेंटिलेटर होते. इतर विकसित देशांत पीपीई किटचा तुटवडा जाणवत असताना केंद्राने राज्यांना 3.70 कोटी एन 95 मास्क आणि 1.60 पीपीई किट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व – सर्वांत महत्त्वाची जमेची बाजू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या कोरोनाविरोधी लढ्यात पुढे राहून नेतृत्व केलं. त्यांनी स्वत: होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होता एक उत्तम उदाहरण जनतेसमोर उभं केलं. असं करणारे ते बहुतेक पहिले आंतरराष्ट्रीय नेते असावेत. त्याचबरोबर जनतेला या महामाथीचं गांभीर्य पटवून दिलं. जनतेच्या सहभागातून त्यांनी जनता कर्फ्यु लागू केला. एक दिवस स्वयंस्फूर्तीने देशभर लॉकडाऊन पाळून भारताची एकी जगाला दाखवून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि जनतेनं जनता  कर्फ्यु यशस्वी करून दाखवला. यातूनच त्यांनी पुढच्या लॉकडाऊनची तयारी करून घेतली. त्यानंतर 'जान है तो जहान है' संदेश देत 24 मार्चला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला.

हे वाचा - 'पुणेकरांनी शोधलेल्या Corona Vaccine वर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये'

लॉकडाऊनच्या काळात मोदींनी हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचं महत्त्व जनतेला समजवून सांगितलं. त्यानंतर पुढच्या फळीत लढणाऱ्या आरोग्य सेवकांचं कौतुक करण्यासाठी मोदींनी देशवासीयांना दिवे लावण्याचं आवाहन केलं. अनलॉकपूर्वी त्यांनी 'जान भी जहान भी' हे तत्त्व सर्वांसमोर मांडलं. अशाप्रकारे व्यवस्थित नियोजन करून भारत लॉकडाउनकडून अनलॉकपर्यंत पोहोचला.

महामाथीत सरकारीची मदत

लॉकडाऊनचा आर्थिक फटका जनतेला बसल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारने ते दु:ख कमी करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKP) 1.70 लाख कोटी रुपयांचं अन्नधान्य वाटलं आणि रोख रक्कम महिला, गरीब ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केले. या योजनेतून 42 कोटी गरिबांना 68 हजार 820 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली. पीएम-किसान योजनेअंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत 17 हजार 891 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.

हे वाचा - वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम ऑफिस? 83% भारतीय म्हणतात...

जनधन योजनेतील महिलांच्या खात्यांत 31 हजार कोटी रुपये, 2.81 कोटी रुपये ज्येष्ठ, दिव्यांग आणि विधवांच्या खात्यांत जमा करण्यात आले. 1.82 कोटी बांधकाम मजुरांना 4 हजार 987 कोटी रुपये, उज्ज्वला योजनेअंतर्गत 13 कोटी रुपयांचे मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले. गरिब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी जणांना अन्नधान्य देण्यात आलं. जिथं जिथं रोख रक्कम देण्यात आली ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली.

जागतिक फार्मसी उद्योग

देशातील लशीच्या प्रक्रियेवर पंतप्रधान मोदींचं सतत लक्ष होतं. पहिल्यांदा त्यांनी अहमदाबादमधील झायडस कॅडिला, नंतर हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला आणि मग पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट देऊन लस विकसनाचा आढावा घेतला. यापैकी दोन लशी संपूर्ण स्वदेशी आहेत. 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला आणि जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीला भेट देणार आहेत.

अनलॉकचा परिणाम : हाय फ्रीक्वेन्सी इंडिकेटर्स वाढताहेत

अनलॉक झाल्यावर देशाच्या अर्थचक्राला हळूहळू गती आली आहे. मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेर्स इंडेक्स (PMI) ऑक्टोबर 2020 मध्ये 58.9 झाला. पॉवर कन्स्ट्रक्शनमध्ये इयरऑन इयर 12.1 टक्के वाढ झाली. शेती उद्योग आणि सेवा या सर्वच क्षेत्रांत अनलॉकनंतर गती आली आणि अर्थचक्र वेग पकडू लागलं. ऑक्टोबर महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 2 टक्क्यांनी वाढली आहे. दुचाकींचीही विक्री 16 टक्क्यांनी वाढली आहे. ग्रामीण भागात ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजमुळे ग्रामीण अर्थचक्रालाही चालना मिळाली आहे. E-way बिलांमध्ये ऑक्टोबर अखेरीस YoY 21. 4 टक्क्यांची वाढ झाली असून 641 लाखांचा कर जमा झाला आहे. जीएसटी कर संकलन आठ महिन्यात सर्वाधिक झालं असून ऑक्टोबर महिन्यात 1.05 लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेचा प्रवाशांच्या बुकिंगमधील महसूल 533.27 कोटी मिळाला.

हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर...; लशीच्या SIDE EFFECT बाबतही तज्ज्ञांनी केलं सावध

कार्गो ट्रॅफिकमध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली तर देशांतर्गत विमान प्रवासातून मिळणारा महसूल ऑक्टोबरमध्ये 52.71 लाख रुपये होता. मनरेगामध्ये 20-21 या आर्थिक वर्षात 252.4 कोटी पर्सन डे वर्क निर्माण झालं.

महामासाथीचा आर्थिक परिणाम

आर्थिक वर्ष 20 मधल्या क्यू 2 मध्ये जीडीपी उणे 7.5 टक्के झाला होता जो पहिल्या तिमाहीत क्यू 1 मध्ये उणे 23.9 टक्के झाला. क्यू 1 आणि क्यू 2 मध्ये कृषी क्षेत्रात  3 टक्क्यांची वाढ झाली. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्यू 1 मध्ये उणे 39 टक्के  होतं. त्या तुलनेत क्यू 2 मध्ये 0.6 टक्के वाढ झाली.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Pm modi, PM narendra modi