Explainer : NRC मागची मोठी भीती ठरत असलेली डिटेन्शन सेंटर नक्की आहे काय, आहेत कुठे?

Explainer : NRC मागची मोठी भीती ठरत असलेली डिटेन्शन सेंटर नक्की आहे काय, आहेत कुठे?

PM नरेंद्र मोदी आपल्या भाषणांत उल्लेख करत असलेले डिटेंशन सेंटर नक्की आहे तरी काय? कोणाला येथे ठेवले जाते? एका क्लिकवर वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं

  • Share this:

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : देशभरात सध्या नागरिकत्व कायदा 2019 (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टरविरुद्ध (NRC) आणि समर्थनार्थ सध्या जोरदार प्रदर्शन सुरू आहे. या सर्वात सर्वाधिक चर्चेचा आणि विवादास्पद मुद्दा आहे डिटेन्शन सेंटरचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी आपल्या भाषणांमध्ये या सेंटरचा उल्लेख केला होता. मात्र गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीत याआधीच बऱ्याच राज्यांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. गृह मंत्रालयानं जुलै 1998मध्ये दिलेल्या अहवालानुसार दिल्ली, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पंजाबमध्येही डिटेन्शन सेंटर उपस्थित आहेत.

काय आहे डिटेन्शन सेंटर?

डिटेन्शन सेंटर अशा जागेला म्हणतात जिथे बेकायदेशीररित्या देशात घुसणाऱ्या परदेशी नागरिकांना ठेवले जाते. थोडक्यात, जे नागिरक भारतीय नाही त्यांना ठेवण्याची जागा. या सेंटरमध्ये राहणाऱ्या लोकांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसतात. अशा बेकायदेशीर लोकांची ओळख पटवून दिल्यानंतर त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले जाते. हे नागरिक कोणत्या देशाचे आहेत हे समजल्यावर त्यांना डिटेन्शन सेंटरमधून त्यांच्या देशात पाठवण्याची सोय केली जाते. फक्त भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये डिटेन्शन सेंटर आहेत. भारतात, परदेशी कायदा 1946च्या कलम 3 (2) नुसार, भारत सरकारकडे बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा अधिकार आहे. या कायद्याच्या कलम 3 (2) (ई) मध्ये तरतूद आहे की, कोणीही राज्य डिटेंशन सेंटर बनवू शकते.

वाचा-घुसखोरांना बाहेर काढा म्हणणाऱ्या शिवसेनेच्या तोंडाला सत्तेमुळे कुलूप - फडणवीस

वाचा-Employee Provident Fund : 25 हजार रुपयांच्या बेसिक पगारात मिळवा 1 कोटी रुपये

जगातील पहिले डिटेन्शन सेंटर

युरोपियन इतिहासकारांनुसार, पहिले डिटेन्शन सेंटर 1417 मध्ये बनवण्यात आले होते. फ्रान्सचा राजा चार्ल्स पंचमने बनवले होते. आज या सेंटरला बेसिले सेंट एंटोनी नावाने ओळखले जाते. वर्ष 1789 मध्ये फ्रान्स क्रांतीच्या वेळी डिटेन्शन सेंटरवर हल्ला देखील करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे दखल

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डिटेन्शन सेंटरमध्ये जिथे बेकायदेशीररित्या देशात घुसणाऱ्या परदेशी नागरिकांना ठेवले जाते. तसेच, परदेशी नागरिकांनी जे गुन्हे केले आहेत, त्यांना शिक्षा म्हणून तिथे ठेवले जाते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं याआधीच या केंद्रांची दखल घेतली आहे. सेंटरमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांची त्यांच्या देशात परत पाठविण्याची कागदपत्रे तयार होईपर्यंत त्यांना येथे ठेवले जाते. परंतु या केंद्रांचा एनआरसीशी काही संबंध नाही.

वाचा-HONOR ने टेक्नो सॅव्हींसाठी आणलीय स्मार्टफोनमध्ये क्रांती, नव्या पिढीसाठी टेकचिक

या राज्यांमध्ये सुरू आहे डिटेन्शन सेंटर

आसाममधील तुरुंगांचा काही भाग डिटेन्शन सेंटर म्हणून तयार करण्यात आले होते. आसाममधील गोलपारा, तेजपूर, कोकराझार आणि दिब्रुगड येथेही बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या नागरिकांना ठेवण्यासाठी केंद्र आहेत. तसेच, दिल्लीतील लामपूर आणि शाजदाबाग येथेही हे केंद्र सुरू करण्यात आली आहेत. गुजरात आणि तामिळनाडूमध्येही डिटेन्शन केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे पंजाबमधील अमृतसरच्या मध्यवर्ती कारागृहात आणि राजस्थानमधील अलवर कारागृहातही डिटेन्शन सेंटर तयार करण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Explainer
First Published: Dec 27, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या