Explainer : बिपीन रावत पहिले CDS : पाकिस्तान युद्धानंतरचा इंदिरा गांधींचा प्लॅन मोदी सरकारने केला पूर्ण

Explainer : बिपीन रावत पहिले CDS : पाकिस्तान युद्धानंतरचा इंदिरा गांधींचा प्लॅन मोदी सरकारने केला पूर्ण

तर 1971मध्येच मिळाले असते भारताला पहिले CDS, वाचा काय आहे इतिहास.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भारतात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असणार अशी ऐतिहासिक घोषणा केली. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष लागले होते ते या पदावर कोणाची नियुक्ती केली जाणार. दरम्यान केंद्र सरकारनं भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. आज मंत्रिमंडळ समितीने रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. याआधी सरकारच्या वतीनं या पदाचा कार्यकाळ वाढवत 65 वर्षे केला होता. त्यामुळं बिपिन रावत हे या पदासाठी योग्य असतील असे ठरवण्यात आले आहे. बिपिन रावत 31 डिसेंबर रोजी सैन्यातून निवृत्त होत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीडीएस अन्य सैन्य प्रमुखांप्रमाणेच असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली असली तरी, इंदिरा गांधी यांनी 1971च्या युद्धानंतर CDSची कल्पना मांडली होती. मात्र त्यावेळी तिन्ही दलाच्या प्रमुखांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर 1999 मध्ये कारगिल आढावा समितीने सरकारचा एकच लष्करी सल्लागार म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तयार करण्याची सूचना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. संरक्षण मंत्रालयांतर्गत नवीन सैन्य विभाग तयार करण्याचेही सरकारने ठरविले आहे आणि संरक्षण प्रमुख सैन्य व्यवहार विभाग प्रमुख असतील आणि त्याचे सचिव म्हणून काम करतील.

तर 1971मध्येच मिळाले असते भारताला पहिले CDS

सैन्यात केएम कॅरियप्पा आणि सॅम माणेकशॉ यांना फील्ड मार्शलचा दर्जा देण्यात आला. असे म्हटले जाते की 1971च्या युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माणेकशॉ यांना फील्ड मार्शलची पदवी देऊन CDS बनवायचे होते. मात्र हवाई दल आणि नौदल प्रमुखांमध्ये झालेल्या मदभेदानंतर ही मागणी फेटाळण्यात आली. यामुळे वायू सेना आणि नौदलाचे कद कमी होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, माणेकशांना फील्ड मार्शल रँक देण्याचे मान्य केले. सॅम जून 1972 मध्ये सेवानिवृत्त होणार होता. त्यांच्या कार्यकाळात रँक देण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. जानेवारी 1973 मध्ये त्याला हे पद देण्यात आले होते.

तयार होणार सैन्याचा नवा विभाग

संरक्षण मंत्रालयांतर्गत नवीन सैन्य विभाग तयार करण्याचेही सरकारने ठरविले आहे आणि संरक्षण प्रमुख सैन्य व्यवहार विभाग प्रमुख असतील आणि त्याचे सचिव म्हणून काम करतील. 1999 मध्ये कारगिल आढावा समितीने सरकारचा एकच लष्करी सल्लागार म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तयार करण्याची सूचना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

CDSचे प्रमुख काम

1999 मध्ये कारगिल आढावा समितीने सरकारला एकच सैन्य सल्लागार म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तयार करण्याची सूचना केली. सीडीएसचे मुख्य काम म्हणजे संसाधनांच्या चांगल्या वापरासाठी सैन्य कमांडची पुनर्रचना करणे तसेच संयुक्त नाट्य कमांड तयार करून संयुक्तपणे ऑपरेशन करणे. तसेच येत्या तीन वर्षांत सीडीएसचे मुख्य काम हे तीन सैन्य, रसद, वाहतूक, प्रशिक्षण, सहाय्य सेवा, संप्रेषण, काळजी आणि दुरुस्तीची कामे एकत्रित करणे. जगातील सर्व प्रमुख शक्तींच्या सैन्यात ही स्थिती आहे. 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ' या अधिकाऱ्यावर तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.

या देशांमध्येही आहे 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ'

'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ' हे पद ब्रिटन, श्रीलंका, इटली, फ्रान्स यासह किमान दहा देशांत आहे. यात आता भारताचा समावेश झाला आहे. सीडीएसचे अधिकार मात्र प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 07:57 PM IST

ताज्या बातम्या