सेक्स करतानाही वापरा मास्क; कोरोनापासून बचावासाठी तज्ज्ञांचा सल्ला

सेक्स करतानाही वापरा मास्क; कोरोनापासून बचावासाठी तज्ज्ञांचा सल्ला

शारीरिक संबंध ठेवताना कोरोनापासून वाचवण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय कोणता याचा अभ्यास संशोधकांनी केला.

  • Share this:

वॉशिंग्टन, 05 जून : कोरोनापासून (corona) वाचण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. हा लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. अशात लॉकडाऊननंतर एकमेकांना भेटणाऱ्या जोडीदारांबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन व्यक्ती शारीरिकरित्या एकत्र येण्यामुळे कोरोनाव्हायरसची लागण होण्याची शक्यता लक्षात घेत हा धोका कसा रोखता येईल याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास केला.

कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना म्हणजे सेक्स (sex) करतानाही मास्क (mask) वापरा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे वाचा - कोरोना लॉकडाऊनमध्ये वाया गेली दारू; आता वाचवणार लोकांचा जीव

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी शारीरिक संबंध ठेवताना कोरोनाव्हायरसपासून कसा बचाव करता येईल, याचा रिपोर्ट अॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसीन (Annals of Internal Medicine) या जर्नलमध्ये प्रकाशित केला.

संशोधकांनी  शारीरिक संबंध ठेवताना कोरोनापासून वाचवण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय कोणते ते पाहिले. शारीरिक संबंध ठेवताना मास्क लावणं हा कोरोनापासून बचाव करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे संसर्गाचा धोका खूपच कमी होईल. मात्र असं करणं बहुतेक वेळा शक्य नसेल असंही शास्त्रज्ञ म्हणाले. त्यामुळे दुसरा सुरक्षित उपाय हस्तमैथुन असल्याचं संशोधक म्हणालेत.

हे वाचा - रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करणं योग्य की अयोग्य; शरीरावर काय होतो परिणाम?

लॉकडाऊनमध्ये एकाच घरात राहिलेल्या कपल्सना तसा धोका कमी आहे, तरीही त्यांनी मास्क घालावं. मात्र लॉकडाऊनमध्ये जे कपल्स वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेत आणि लॉकडाऊन संपल्यानंतर एकमेकांना भेटणार आहेत, त्यांनी विशेष खबरदारी घ्यायला हवी असं तज्ज्ञांनी सांगितलं. तसंच आपल्या जोडीदारामध्ये कोरोनाची काही लक्षणं तर दिसत नाहीत ना हेदेखील पाहावं, असं तज्ज्ञ म्हणालेत.

First published: June 5, 2020, 11:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या