'पाकिस्तान ढोंगी देश आणि इम्रान खान हा लष्काराच्या हातातलं बाहुलं'

'पाकिस्तान ढोंगी देश आणि इम्रान खान हा लष्काराच्या हातातलं बाहुलं'

इम्रान खान यांची भूमिका म्हणजे उलट्या चोराच्या बोंबा आहेत. पुरावे देऊनही पाकिस्तान काहीही करत नाही.

  • Share this:

मुंबई 19 फेब्रुवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवेदनावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानात लष्कराच्या आदेशाशीवाय काहीही होत नाही त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानी लष्कराच्या चिथावणीमुळेच झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचा जो प्रस्ताव दिला ते केवळ नाटक असून पाकिस्तानला चर्चेत स्वारस्य नाही असं मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

या आहेत तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

शिवाली देशपांडे, निवृत्त फ्लाईंग ऑफिसर

इम्रान खान यांची भूमिका म्हणजे उलट्या चोराच्या बोंबा आहेत. पाकिस्तान हा ढोंगी देश आहे. मुंबईवरचा हल्ला, पठाणकोट हल्ला या सगळ्याचे पुरावे भारताने दिले होते मात्र पाकिस्तानने काहीही केलं नाही. इम्रान खान यांनी लष्कराने लिहून दिलेलं स्क्रिप्ट वाचलं आहे. इम्रान खान यांनी केवळ घाबरून वक्तव दिलं आहे. त्याला भीक न घालता पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे.

मेजर शशिकांत पित्रे, निवृत्त

पाकिस्तानवर हल्ला करणार असं कुणीही म्हटलेलं नाही. लष्कराने किंवा पंतप्रधान मोदींनीही असं म्हटलं नाही. फक्त गुन्हेगारांना धडा शिकवू असं भारताने म्हटलं आहे. इम्रान खान यांनी ढाळलेले अश्रू हे नकाश्रू आहेत. पुरावे देऊनही पाकिस्तान काहीही करत नाही हे 26/11 च्या घटनेनंतर दिसलं आहे.

शैलेंद्र देवळाणकर

इम्रान खान यांची प्रतिक्रिया गांभीर्याने घेऊ नये. याधीही  त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं. पाकिस्तानला चर्चाच करायची नाही. त्यांनी काश्मीरमध्ये हायब्रिड वॉर सुरू केलं आहे. त्यांना लष्कराने पंतप्रधान पदावर बसवलं आहे. त्यामुळे ते लष्कराचीच भाषा बोलणार. लष्कराचं हे सुनियोजित कारस्थान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 04:14 PM IST

ताज्या बातम्या