Home /News /national /

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त, जगातील आकडेवारीवरुन झाला मोठा खुलासा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त, जगातील आकडेवारीवरुन झाला मोठा खुलासा

जगातील आकडेवारी पाहिली तर मृत झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे

    नवी दिल्ली, 26 मार्च : आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जीवघेण्या कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) भारतात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पहिला मृत्यू 12 मार्च रोजी कर्नाटकातील कलबुर्गी शहरात झाला. त्या 76 वर्षीय व्यक्तीला उच्च रक्तदाब, दमा आणि मधुमेहाचा त्रास होत होता. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीनी कोविड -19 (Covid - 19) ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याचप्रमाणे देशातील दुसरा मृत्यू दिल्लीतील 1 मार्च रोजी एका महिलेचा झाला होता. कॉम्रेडॅशिपच्या त्यांचा मृत्यू झाला होता. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त आजाराने ग्रस्त असते तेव्हा कॉम्रेड ही संज्ञा वापरली जाते.  आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ती महिला 68 वर्षांची होती आणि तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाबाता त्रास होता. 5 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान स्वित्झर्लंड आणि इटली येथे गेलेल्या आपल्या मुलाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली होती. तिचा मुलगा 23 फेब्रुवारीला भारतात परतला होता. ती महिला मुलाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली होती. संबंधित - सरकारची गरिबांसाठी अन्न आणि धान्य योजनेची घोषणा, खर्च करणार 1.70 लाख कोटी कोरोनोव्हायरसमुळे मुंगेर येथे राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मूत्रपिंडाचा त्रास असल्याने 22 मार्च रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात एका आठवड्यात किमान 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वचजण आजारी होते. ज्यांपैकी दोन 63 वर्षांचे आणि एक 65 वर्षांचे होते. आणखी एक व्यक्ती देखील 60 च्या आसपास होती. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्यात रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाची समस्या यासारख्या अनेक आजाराने ग्रस्त होते. पंजाबमध्ये, इटलीमार्गे जर्मनीहून आलेल्या 72 वर्षीय व्यक्तीचेही कोरोनाव्हायरस विषाणूमुळे निधन झाले आणि कोलकाता येथील एका 55 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. तो 50 वर्षांचा होता. नुकताच अमेरिकेतून परत आलेल्या 69 वर्षीय तिबेटी व्यक्तीचा सोमवारी मृत्यूही झाला. पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू झाला, तो 57 वर्षांचा होता, आश्चर्य म्हणजे तोही एक पुरुषही होता. एक महिलेव्यतिरिक्त मृत झालेले सर्व पुरुष होते. भारतातील सर्व कोरोनाव्हायरस मृत्यूंपैकी एक सामान्य प्रथा अशी आहे की त्यातील बहुतेक पुरुष होते. ज्यांचे वय 50 ते 60 दरम्यान  होते आणि जवळजवळ सर्व मृत व्यक्ती हे विविध आजाराने ग्रस्त होते. मृत झालेल्या सर्वांच्या तुलनेत बिहारमध्ये मरण पावलेला एक माणूस फक्त एक तरुण होता. संबंधित - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज, मोदी सरकारच्या 7 मोठ्या घोषणा असाच डेटा चीनमधून प्राप्त झाला आहे, जेथे कोरोनाव्हायरसचा उद्रेक  पहिल्यांदा झाला. दिल्लीचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यापूर्वी देखील निदर्शनास आणून दिले होते की वैद्यकीय टीमने आतापर्यंत अभ्यासलेल्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की, पुरुषांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. आश्चर्य म्हणजे भारतातही तेच दिसून आले आहे. डॉ. पी. वेंकट कृष्णन मन्हाळे, गुरुग्रामचाय पारस रुग्णालयात वैद्यकीय विभागांतर्गत काम करतात ते म्हणाले, " असे आढून आले आहे की जेव्हा एखादा नवीन विषाणू एखाद्या देशात प्रवेश करतो, तेव्हा वृद्धांना याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. गाझियाबाद येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे फुप्फुस तज्ज्ञ डॉ. ज्ञान भारती यांनी सांगितले की, "घरी राहणारे वृद्ध लोक तयार केलेल्या हेल्थ प्रोटोकॉलचे पालन करून त्यांना संसर्ग होण्यापासून रोखू शकतात. मात्र त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी अल्याने त्यांना बाहेरील विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक असते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या