कांकेर, 30 ऑगस्ट : छत्तीसगड (Chhattisgarh) मधील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये 580 रुपये प्रति किलोने टॉमेटो (Tomato) खरेदी केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कांकेर (Kanker) जिल्ह्यातील इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये इतक्या महागात टॉमेटोची खरेदी झाली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामागे भ्रष्ट्राचार असल्याचे सांगितले आहे. तर अधिकारी या प्रकरणात काहीच वक्तव्य करीत नसल्याचे समोर आले आहे. लॉकडाउन (Lockdown) च्या दरम्यान इमलीपाराच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये अन्य राज्यातून येणाऱ्या मजदूर आणि विद्यार्थी यांना ठेवण्यात आलं होतं. यांची खाण्याच्या व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. RTI अंतर्गत या गोष्टीचा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजी तयार करण्यासाठी 580 रुपये किलो टॉमेटोची खरेदी केल्याची माहिती समोर आली, मात्र मूळात टॉमेटोची किंमत 20 रुपये किलो आहे. सोबतच अन्य भाज्यांच्या किंमतीदेखील बाजारमूल्याहून अधिक बिल दाखविण्यात आलं आहे.
हे वाचा-Unlock 4.0 : नवीन गाईडलाईननुसार, काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?
या क्वारंटाईन सेंटरमध्ये खाण्याच्या साहित्याची जबाबदारी आदिवासी कल्याण विभाग जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आली होती. विभागातील जबाबदार लोकांनी भाज्या आणि इतर साहित्यांच्या खरेदीचं बिल अव्वाच्या सव्वा लावलं आहे. याचं पैसे विभागाने दिले आहेत. इतकचं नाही तर क्वारंटाइन सेंटरसाठी खरेदी केलेल्या साहित्याच्या बिलांमध्ये जीएटी आणि टीआयएन क्रमांकही नाही. मिळालेल्या माहितीनुसार या क्वारंटाइन सेंटरमध्ये लॉकडाऊनदरम्यान व्यवस्था तयार करण्यासाठी 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले.