News18 Lokmat

Exit Polls 2019 : उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींना बसणार धक्का

उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पण, त्यांच्या पदरी अपयश येण्याची चिन्ह आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 10:57 PM IST

Exit Polls 2019 : उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींना बसणार धक्का

मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, आज निकालाआधी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. निकालापूर्वी सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पण, त्यांच्या पदरी अपयश येण्याची चिन्ह आहे.'प्रियांका गांधी आयी है, नई रोशनी लाई है' या घोषणेनं ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात एंट्री घेतली. त्यांना सरचिटणीस पदभार देण्यात आला. प्रियांका गांधींनी गेल्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये झंझावती प्रचार केला. परंतु, न्यूज18 च्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 1-2 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच इतरही एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 2-3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. इथं सपा आणि बसपाला सर्वाधिक जागा मिळतील. तर भाजपला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.


'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार आलेले अंदाज

पक्ष जागा (542) टक्केवारी

NDA 336 48.5 टक्के

Loading...

भाजप 276 39.6 टक्के

घटकपक्ष 60 8.9 टक्के


UPA 82 25.0 टक्के


काँग्रेस 46 18.8 टक्के


आघाडी 36 6.2 टक्के


अन्य 124 26.5 टक्के


टीएमसी 38 4.5 टक्के


सपा 10 2.1 टक्के


बसपा 7 2.5 टक्के


टीआरएस 12 1.6 टक्के


बीजेडी 13 2.0 टक्के


YSRCP 13 1.9 टक्के


डावे 12 2.6 टक्के


आप 1 0.2 टक्के


टीडीपी 11 1.9 टक्के


अन्य 7 7.2 टक्के


'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार, देशात 'फिर एक बार मोदी सरकार' येणार असल्याचं चित्र दिसत आहे. यंदाही मोदी लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदिगडमध्ये एकाच टप्प्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.


विशेष म्हणजे यंदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT यंत्र बसवण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव मतदारांना मोबाइल, बॅग्स अन्य कोणते सामनाही केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.

विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळतं?


लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागेच्या किमान 10 टक्के जागा जिंकणं आवश्यक असतं. किमान 55 जागा असतील तरच विरोधी पक्षनेते पद मिळवता येतं. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या.


लोकसभा निवडणूक 2014 जागा 543


पक्ष जागा टक्केवारी


भाजप 282 31.04 टक्के


काँग्रेस 44 19.27 टक्के


एडीएमके 37 3.27 टक्के


टीएमसी 34 3.85 टक्के


बीजेडी 20 1.72 टक्के


शिवसेना 18 1.86 टक्के


टीडीपी 16 2.49 टक्के


अन्य 92 36.26 टक्के


News 18-IPSOS Exit Pollचे अचूक अंदाज


लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. यात लोकसभेच्या 543 जागांपैकी 199 जागांची निवड करण्यात आली. देशातल्या 28 राज्यांमधल्या 199 मतदारसंघातल्या 796 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कौल घेण्यात आला. यात 4776 मतदान केंद्रातून 25 मतदारांची निवड करण्यात आली.


या प्रक्रियेत विविध मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवरच्या मतदारांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत. 199 लोकसभा मतदारसंघात किमान दीड लाख लोकांची मतं जाणून घेण्यात आलीत. या मतदार संघांची निवड करतानाही विशेष काळजी घेण्यात आली. ज्या मतदार संघात जो उमेदवार सलग दोन किंवा तीन वेळा निवडून आला असेल किंवा जिथे विजयातलं अंतर कमी असेल, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळे निकाल लागतात, ज्या ठिकाणी दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत, अशा विविध मतदारसंघांची निवड करण्यात आली.


त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या चार किंवा सहा विधानसभा मतदार संघातल्या सहा मतदान केंद्रातून विविध मतदारांची निवड करण्यात आली. मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या प्रत्येक तिसऱ्या मतदाराला हे प्रश्न विचारण्यात आले. यात विविध वयोगट, भाषा, संस्कृती आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करण्यात आला. अचूक Exit Poll येण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व घटकांची काळजीही घेण्यात आली.


====================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2019 10:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...