काँग्रेस 100च्या आत; राहुल गांधींना पुन्हा अपयश?

लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविधी एक्झिट पोल नुसार मात्र काँग्रेसची निराशा झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 08:21 PM IST

काँग्रेस 100च्या आत; राहुल गांधींना पुन्हा अपयश?

नवी दिल्ली, 19 मे: लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. इतक नव्हे तर अनके पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी भाजपचा पराभव केला होता. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल असे वाटत होते. लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोल नुसार मात्र काँग्रेसची निराशा झाली आहे.

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 132 जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. रिपब्लिकनुसार त्यांना 127, एबीपी नेल्सन यांच्या एक्झिट पोल नुसार 127, एनडीटीव्ही नुसार 127, न्यूज एक्सनुसार 162 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्व पोलची सरासरी काढल्यास काँग्रेस आघाडीला केवळ 135 जागा मिळतील असे चित्र आहे. तर जन मन की बातच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीला 124 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आक्रमक पद्धतीने मोदी सरकावर टीका केली होती. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी यांनी देखील मोदींच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला होता. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला फार मोठे यश मिळाल्याचे दिसत नाही.

जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काँग्रेस आघाडीला सरासरी 120 ते 135 दरम्यानच्या जागा मिळणार आहेत. याचाच अर्थ यातील काँग्रेसच्या जागा 100च्या आतच असतील.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...