पश्चिम बंगाल, 19 मे : उत्तर प्रदेशनंतर ज्या दोन राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्त सभा घेतला ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल दुसऱ्या नंबरवर आहे. त्याच बरोबर निवडणुकांदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसा झाली. त्यामुळे या राज्याची सगळ्यात जास्त चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचा वादही शिगेला गेला आहे. त्यामुळे बंगालमध्ये कमळ की गवतफूल बहरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पाहुयात एक्झिट पोलने काय अंदाज दिले आहेत.
एकूण 42 जागांपैकी बंगालच्या 11 जागांवर भाजप तर काँग्रेस 2 जागांवर जिंकण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 29 जागा मिळतील असं भाकित करण्यात आलं आहे.
2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण भाजपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती.
हेही वाचा : EXIT POLL : काँग्रेसच्या राज्यात राहुलला धक्का, मोदी लाटेमुळे पुन्हा 'कमळ'
मतांची टक्केवारी गृहित धरली तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. चार जागा मिळवूनसुद्धा काँग्रेस वोट शेअरमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची डावी आघाडी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवूनही 2 जागीच विजयी होऊ शकली होती.
सगळ्या विशेष म्हणजे 2014च्या निवडणुकांध्ये भाजपला फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. तर यावेळी मात्र भाजप 11 जागांवर विजय मिळवेल असा दावा करण्यात आला आहे. यावेळी बंगालमध्ये मतदारांची संख्या देखील 16.8 टक्क्यांनी वाढली आहे.
यावेळी एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजावर विश्वास ठेवला तर, भाजप कुठेतरी तृणमूल काँग्रेसच्या जागांवर सुरूंग लावण्यात यशस्वी झाला आहे. 31.86 टक्के मतांनी भाजप 9 जागांवर फायद्यात असल्याचं दिसतं. तर राज्यात सरकार चालवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षात वोट शेअर कमी झाल्याचं पाहायला मिळतं.
2014 मध्ये भाजपला असनसोल आणि दार्जिलिंग या दोन जागांवर यश मिळालं होतं. मालदा दक्षिण, कोलकाता उत्तर आणि कोलकाता दक्षिण या जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना लक्षणीय मतं मिळाली होती. आता पश्चिम बंगालमधल्या किमान अर्ध्या जागा खिशात घालायचं भाजपचं लक्ष्य आहे, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूलला असलेल्या जागा टिकवून ठेवायचं आव्हान आहे.
EXIT POLL VIDEO : सुळे की कूल, खैरे की जलील; कोण जिंकणार?