S M L

EXIT POLL : Republic च्या सर्व्हेत पुन्हा मोदी सरकार; पाहा काँग्रेसला मिळणार किती जागा?

सीव्होटर (CVoter) आणि रिपब्लिक टीव्हीने (RepublicExitPoll) केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 07:11 PM IST

EXIT POLL : Republic च्या सर्व्हेत पुन्हा मोदी सरकार; पाहा काँग्रेसला मिळणार किती जागा?

मुंबई, 19  मे : सीव्होटर (CVoter) आणि रिपब्लिक टीव्हीने (RepublicExitPoll) केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.

असा आहे रिपब्लिकचा अंदाज

भाजप  NDA 305


काँग्रेस UPA 124

सप-बसप महागठबंधन 26

अन्य 87

Loading...

दरम्यान, News18 ने IPSOS च्या मदतीने देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे

यावेळीची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता. माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

मागच्या लोकसभेची काय होती परिस्थिती?

लोकसभा निवडणूक 2014  जागा 543

पक्ष        जागा         टक्केवारी

भाजप     282        31.04 टक्के

काँग्रेस     44        19.27 टक्के

एडीएमके     37         3.27 टक्के

टीएमसी    34        3.85 टक्के

बीजेडी    20        1.72 टक्के

शिवसेना    18        1.86 टक्के

टीडीपी     16        2.49 टक्के

अन्य        92        36.26 टक्के

लोकसभा निवडणूक 2014 : मोदी लाट

2014मध्ये देशात नऊ टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीचे निकाल 16 मे 2014 रोजी लागले होते. 2014च्या निवडणुकीत एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. पण सध्याची भाजपची सदस्य संख्या 268 एवढी आहे.

बहुमताचा जादुई आकडा 272

कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 272 जागा आवश्यक असतात. जर बहुमतासाठी काही जागा कमी पडत असतील तर मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करता येऊ शकते. राजकीय पक्ष निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकांनंतर एकत्र येऊन आपलं सरकार स्थापन करू शकतात.

विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळतं?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागेच्या किमान 10 टक्के जागा जिंकणं आवश्यक असतं. किमान 55 जागा असतील तरच विरोधी पक्षनेते पद मिळवता येतं. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फक्त 44 जागांवर विजय मिळवता आला होता.

लोकसभा निवडणूक 2019 : 7 टप्प्यात पार पडलं मतदान

पहिला टप्पा : 20 राज्यांतील 91 मतदारसंघ

दुसरा टप्पा : 14 राज्यांतील 97 मतदारसंघ

तिसरा टप्पा : 14 राज्यातील 115 मतदारसंघ

चौथा टप्पा : 9 राज्यातील 71 मतदारसंघ

पाचवा टप्पा : 7 राज्यांत 51 मतदारसंघ

सहावा टप्पा : 7 राज्यातील 59 मतदारसंघ

सातवा टप्पा :  8 राज्यातील 59 मतदासंघ

तर दुसरीकडे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदिगडमध्ये एकाच टप्प्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली.

तर महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

VVPAT यंत्रांची सुविधा

विशेष म्हणजे यंदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT यंत्र बसवण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव मतदारांना मोबाइल, बॅग्स अन्य कोणते सामनाही केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.

News 18-IPSOS Exit Pollचे अचूक अंदाज

लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि  IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. यात लोकसभेच्या 543 जागांपैकी 199 जागांची निवड करण्यात आली. देशातल्या 28 राज्यांमधल्या 199 मतदारसंघातल्या 796 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कौल घेण्यात आला. यात 4776 मतदान केंद्रातून 25 मतदारांची निवड करण्यात आली.

या प्रक्रियेत विविध मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवरच्या मतदारांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत. 199 लोकसभा मतदारसंघात किमान दीड लाख लोकांची मतं जाणून घेण्यात आलीत. या मतदार संघांची निवड करतानाही विशेष काळजी घेण्यात आली. ज्या मतदार संघात जो उमेदवार सलग दोन किंवा तीन वेळा निवडून आला असेल किंवा जिथे विजयातलं अंतर कमी असेल, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळे निकाल लागतात, ज्या ठिकाणी दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत, अशा विविध मतदारसंघांची निवड करण्यात आली.

त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या चार किंवा सहा विधानसभा मतदार संघातल्या सहा मतदान केंद्रातून विविध मतदारांची निवड करण्यात आली. मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या प्रत्येक तिसऱ्या मतदाराला हे प्रश्न विचारण्यात आले. यात विविध वयोगट, भाषा, संस्कृती आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करण्यात आला. अचूक Exit Poll येण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व घटकांची काळजीही घेण्यात आली.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2019 06:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close