EXIT POLLमुळे NDAमध्ये उत्साह, सर्व पक्षांची बोलावली बैठक

EXIT POLLमुळे NDAमध्ये उत्साह, सर्व पक्षांची बोलावली बैठक

एक्झिट पोल'च्या निकालांनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत उत्साह संचारला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 19 मे : 'एक्झिट पोल'च्या निकालांनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत उत्साह संचारला आहे. जवळपास सर्वच 'एक्झिट पोल'मध्ये भाजप आणि एनडीला बहुमत मिळणार असं दाखविल्याने भाजपला मोठा दिलासा मिळालाय. या पार्श्वभूमीवर  NDAमधल्या सर्व घटकपक्षांची बैठ नवी दिल्लीत बोलावण्यात आलीय. 21 मे रोजी ही बैठक बोलावण्यात आली असून त्याला सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आलंय.

रविवारी सकाळपासून राजधानी दिल्लीत आज राजकीय हालचालींना वेग आला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भेटीचा सपाटा लावल्याने राजकीय वातावरण तापलं होतं. चंद्राबाबूंनी राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. मात्र सायंकाळी जस जसे EXIT POLLचे निकाल यायला लागले तसं चंद्राबाबूंच्या हालचाली मंदावल्या.

तर तिकडे एनडीएतल्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला. 21 मे रोजी सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे.

NDAबाजी मारणार

सतराव्या लोकसभेचं अखेरचं मतदान संपताच मतदानोत्तर चाचण्यांचे कौल हाती यायला सुरुवात झाली आहे. विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजपचं स्वबळावर सरकार स्थापनेचं स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही, असं बहुतेक एक्झिट पोल मध्ये वर्तवलेल्या अंदाजावरून स्पष्ट झालं. दोन प्रमुख एक्झिट पोलमध्ये रालोआला 300 च्या जागा देण्यात आल्या आहेत.

Loading...

News18 ने IPSOS च्या मदतीने देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. त्याचा सविस्तर अंदाज लवकरच इथे देण्यात येईल. कुठल्या एक्झिट पोल्समध्ये किती आकड्याचा अंदाज वर्तवला आहे पाहा.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2019 09:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...