Exit Poll 2019: उत्तर प्रदेशमध्ये भाजप-महाआघाडीत मोठी चुरस!

न्यूज 18च्या एक्झिट पोलनुसार पहिल्या 3 टप्प्यातील मतदानामध्ये भाजप आणि सपा-बसपा यांच्यात मोठी चुरस दिसून येत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 07:53 PM IST

Exit Poll 2019: उत्तर प्रदेशमध्ये भाजप-महाआघाडीत मोठी चुरस!

नवी दिल्ली, 19 मे: लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये यंदा चुरशीची लढत झाली. सत्ताधारी भाजपने गेल्या म्हणजेच 2014च्या निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव केला होता. तेव्हा मोदी लाटेत भाजपने 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या. यंदा सपा-बसपा यांची आघाडी झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांनी भाजपचा पराभव केला होता. सपा-बसपा सोबतच काँग्रेसने प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती. त्यामुळे भाजपला चांगलीच टक्कर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

न्यूज 18च्या एक्झिट पोलनुसार पहिल्या 3 टप्प्यातील मतदानामध्ये उत्तर प्रदेशमधील 26 पैकी भाजपला 14-16 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 10-12 जागा मिळू शकतील. या टप्प्यात भाजप आणि महाआघाडीने भाजपला चांगली टक्कर दिल्याचे दिसून येते. पण काँग्रेसला 26 पैकी एकही जागा मिळत नसल्याचे दिसते.

2014मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. तर सपाला 5 जागा तर बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर विजय मिळवला होता. भाजपला तेव्हा 43.28 टक्के मते मिळाली होती. तर सपा-बसपा आघाडीला 42.62 टक्के मते मिळाली होती. काँग्रेस आणि युपीएला केवळ 7.47 टक्के मते मिळाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 07:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...