Exit Poll 2019 : उत्तर प्रदेशमध्ये विरोधक पुन्हा भुईसपाट, भाजपने मारली बाजी!

Exit Poll 2019 : उत्तर प्रदेशमध्ये विरोधक पुन्हा भुईसपाट, भाजपने मारली बाजी!

न्यूज 18च्या एक्झिट पोल नुसार देशातील सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप पुन्हा बाजी मारत असल्याचे दिसून येते.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मे: दिल्लीतील सत्तेची वाट उत्तर प्रदेशमधून जाते याचे कारण राज्यात असलेल्या लोकसभेच्या 80 जागा होय. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपने उत्तर प्रदेशच्या जोरावरच स्पष्ट बहुमत मिळवले होते. यंदा मोदी लाट नाही तसेच सपा-बसपाची आघाडी यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा फटका बसेल असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात न्यूज 18च्या एक्झिट पोल नुसार सहा टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या 67 जागांपैकी भाजपला 50-54 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी सपा आणि बसपा ही या दोघांनी आघाडी केली होती. पण एक्झिट पोल नुसार अखिलेश-मायावती यांच्या आघाडीचा भाजपला फार फटका बसल्याचे दिसत नाही. या दोन्ही पक्षांना मिळून राज्यातील 12-16 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातही मायावती यांच्या हत्तीपेक्षा अखिलेश यांच्या सायकलला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोल नुसार सपाला 6-8 तर बसपाला 5-7 जागा मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेतृत्वाखालील युपीएला केवळ दोनच जागा मिळण्याची शक्यता आहे. यावरून काँग्रेसला प्रियांका गांधींच्या प्रवेशाचा काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना सरचिटणीसपद दिले होते आणि पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती. पण प्रियांका यांचा कोणताही प्रभाव दिसून आला नसल्याचे एक्झिट पोलवरून दिसून येते.

2014च्या निकालाशी तुलना करता भाजपला फार मोठा फटका बसल्याचे दिसून येत नाही. 2014मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भजापला 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. तर सपाला 5 जागा तर बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर विजय मिळवला होता. यंदा देखील या निकालात फार बदल झालेला दिसून येत नाही. सपाला 2014 इतक्याच जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बसपाला 5-7 जागा मिळण्याची शक्यता आहे.

असा होता 2014चा निकाल

यंदा उत्तर प्रदेशमध्ये 80 जागांवर 7 टप्प्यात मतदान झाले होते. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने घेतलेल्या नोटा बंदी पासून ते जीएसटी अशा अनेक निर्णयामुळे जनता नाराज आहे असे बोलले जात होते. पण एक्झिट पोलनुसार भाजपला या निर्णयामुळे कोणताही फटका बसलेला दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या पोट निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा फटका बसेल असे बोलले जात होते. त्याच काँग्रेसने देखील प्रियांका गांधी यांना प्रचारात उतरवले होते. त्यामुळे भाजप पुन्हा 2014 सारखी कामगिरी करेल याबाबत शंका होती. न्यूज 18च्या एक्झिट पोल नुसार भाजपने पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये दमदार कामगिरी करत गड राखल्याचे आढळते.

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-375124" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzc1MTI0/"></iframe>

First published: May 19, 2019, 8:17 PM IST

ताज्या बातम्या