S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

लोकसभेची सेमी फायनल : कोण मारणार बाजी, कसे असतिल एक्झिट पोल?

लोकसभेच्या निवडणुकांता आता काही महिनेच शिल्लक असताना ही निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

Updated On: Dec 7, 2018 05:56 PM IST

लोकसभेची सेमी फायनल : कोण मारणार बाजी, कसे असतिल एक्झिट पोल?

मुंबई, 7 डिसेंबर : विधानसभांच्या निवडणुकांचं मतदान शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपलं. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधल्या विधानसभांसाठी ही निवडणुक झाली. यातल्या महत्वाच्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये भाजपचं सरकार असून तेलंगणात टीआरचं राज्य आहे.


लोकसभेच्या निवडणुकांता आता काही महिनेच शिल्लक असताना ही निवडणुका होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम आहे का आणि राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला का हे 11 डिसेंबरला कळणार आहे.


मध्यप्रदेशात काँग्रेस 15 वर्षानंतर सत्ता मिळविण्याचा जोरदार प्रयत्न करतेय.


तर 15 वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी भाजपची धडपड आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आपली पूर्ण ताकद यावेळी प्रचारात लावली होती. मात्र सलग तीन वळा निवडून आल्यामुळं सकारच्या विरोधात लोकांच्या असलेल्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागतोय.


त्याच बरोबर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेही त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र शिवराज सिंग यांची व्यक्तिगत प्रतिमा लोकांमध्ये चांगली आहे ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

तर काँग्रेसने यावेळी ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना बाजूला ठेवून सर्व सूत्र माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि तरूण नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हातात दिली होती.


तिकिट देतानाही काँग्रेसने अनेक नव्या नेत्यांना संधी दिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेशात पहिल्यांदाच 75 टक्के मतदान झालं होतं. या अधिक मतदानाचा फायदा कुणाल होतो हे लवकरच कळणार आहे. 28 नोव्हेंबरला 65 हजार 367 मतदान केंद्रावर मतदान झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close