मराठी बातम्या /बातम्या /देश /

BIHAR EXIT POLL - मोदी, शाहा, नितीश कुमार यांना 'चाणक्य'च्या Exit Poll ने प्रचंड मोठा धक्का

BIHAR EXIT POLL - मोदी, शाहा, नितीश कुमार यांना 'चाणक्य'च्या Exit Poll ने प्रचंड मोठा धक्का

Today's Chanakya च्या Exit Poll  नुसार बिहारमध्ये (Bihar Assembly Exit Poll) भाजप-जदयू आघाडीचा अक्षरशः कचरा होणार, असा अंदाज आहे.

Today's Chanakya च्या Exit Poll नुसार बिहारमध्ये (Bihar Assembly Exit Poll) भाजप-जदयू आघाडीचा अक्षरशः कचरा होणार, असा अंदाज आहे.

Today's Chanakya च्या Exit Poll नुसार बिहारमध्ये (Bihar Assembly Exit Poll) भाजप-जदयू आघाडीचा अक्षरशः कचरा होणार, असा अंदाज आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
पाटणा, 7 नोव्हेंबर :  बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीच्या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. हे राज्य हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विविध EXIT Polls च्या निकालांमध्ये सर्वात मोठा पक्ष पुन्हा एकदा तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल ठरण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांना जेमतेम 40 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बहुतेक सर्व एक्झिट पोलमध्ये महागंठबंधनला 120 च्या वर जागा मिळाल्याचं दाखवण्यात आलं आहे. 243 जागांच्या विधानसभेत 122 हा बहुमताचा आकडा गाठणं तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वालाच शक्य असल्याचं हे अंदाज सांगतात. कदाचित बिहार निवडणूक त्रिशंकूही होऊ शकते. पण सर्वात धक्का देणारे अंदाज वर्तवले आहेत टुडेज चाणक्य च्या एक्झिट पोलने. Today's Chankya च्या एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार, महागठबंधनला 169 ते 191 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर NDA च्या खात्यावर फक्त 44 ते 56 जागांचा अंदाज आहे. यामुळे नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल ठरणार मोठा पक्ष बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी लढत आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव (Tejaswai yadav) याचा मतदानोत्तर चाचणीत कल तपासण्यात आला. आता 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी बिहारचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ABP आणि C VOTER चा अंदाज एकूण जागा – 243 भाजप – 66-74 JDU – 38-46 RJD – 81-89 काँग्रेस – 21-29 LJP – 2 LEFT 6-13 रालोसप – 1-3 अन्य 4-8 TIMES NOW चा अंदाज NDA 116 UPA 120 Others 07 रिपब्लिक जन की बात चा अंदाज एकूण जागा – 243 NDA 91-117 MGB/UPA 118-138 LJP 5-8 OTH 3- 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झालं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातल्या लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला गेल्या निवडणुकीत  71 जागा मिळाल्या होत्या. या वेळी जागा कमी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही सरळ लढत ठरली नाही ती लोकजनशक्ती पक्षामुळे. LJP चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचार केला, पण आपला भाजपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं. निकालानंतर भाजपबरोबर आघाडी करायची पासवान यांची तयारी आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020) RJD ने 144 जागा लढवल्या तर काँग्रेसने 70 आणि CPI(ML) ने 19 जागा लढवल्या. NDA कडून नितीश कुमारांच्या JD (U) 115 जागा लढवल्या तर भाजपचे उमेदवार 110 जागांवर उभे होते. गेल्या वेळच्या बिहार विधानसभा निवडणुकीने सगळ्यांचे अंदाज चुकवले होते. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचा अनुभव त्या वेळी होता. मागच्या बिहार विधानसभेला भाजप आणि नितीश कुमार एकमेकांच्या विरोधात होते. NDA मध्ये नितीश कुमार नव्हते. त्याऐवजी ते काँग्रेस, राजदबरोबर महागठबंधनमध्ये होते.
First published:

पुढील बातम्या