Elec-widget

ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, 'या' मराठी माणसामुळे बंगालमध्ये 'कमळ' फुलणार?

ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, 'या' मराठी माणसामुळे बंगालमध्ये 'कमळ' फुलणार?

सुनील देवधर हे भाजपचे सचिव आहेत. त्यांच्यावर यंदा त्रिपुराबरोबरच आंध्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. तिथलं मतदान झाल्यानंतर देवधर यांनी आपला मोर्चा बंगालकडे वळवला होता.

  • Share this:

पश्चिम बंगाल, 19 मे : उत्तर प्रदेशनंतर ज्या दोन राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्त सभा घेतला ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल दुसऱ्या नंबरवर आहे. बंगालची लढाई सर करण्याची जबाबदारी भाजपनं सुनील देवधर यांच्यावर सोपवली होती. एक्झिट पोलमध्ये आलेल्या अंदाजानुसार, बंगालमध्ये ममता बॅनर्जींना झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालमध्ये सुनील देवधर यांचं प्लानिंग भाजपला जिंकवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपकडून सुनील देवधरांवर बंगालची जबाबदारी

सुनील देवधर हे भाजपचे सचिव आहेत. त्यांच्यावर यंदा त्रिपुराबरोबरच आंध्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. तिथलं मतदान झाल्यानंतर देवधर यांनी आपला मोर्चा बंगालकडे वळवला होता.

शेवटच्या दोन टप्प्यातल्या मतदानाआधी देवधर कोलकात्याला पोहोचले. त्यांच्यावर शेवटच्या टप्प्यातल्या 9 जागांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यातही कोलकात्याच्या चार जागा आहेत.

उत्तर कोलकाता, दक्षिण कोलकाता आणि जाधवपूर या तीन जागांवर भाजपने अधिक लक्ष द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी खास देवधर यांची नेमणूक करण्यात आली होती. या तीनही जागा मागच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या होत्या. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आता तृणमूलच्या बालेकिल्ल्याला धक्का लावायची भाजपची नीती सफल होणार असं दिसतं आहे.

Loading...

हेही वाचा : बंगालमध्ये ममता की मोदी? वाचा EXIT POLL अंदाज...

एक्झिट पोलनुसार,

एकूण 42 जागांपैकी बंगालच्या 11 जागांवर भाजप तर काँग्रेस 2 जागांवर जिंकण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 29 जागा मिळतील असं भाकित करण्यात आलं आहे.

आजतकने दिलेल्या एक्झिट पोलनुसार, भाजप 16 जागांवर बाजी मारणार असून तृणमूल  काँग्रेसला 26 तर काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. एबीपीनेदेखील असाच एक्झिट पोल दिला आहे. त्यामुळे बंगालमध्ये ममतांच्या बालेकिल्ल्यात भाजप सुरूंग लावण्याची चिन्ह आहेत.

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण भाजपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती.

मतांची टक्केवारी गृहित धरली तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. चार जागा मिळवूनसुद्धा काँग्रेस वोट शेअरमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची डावी आघाडी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवूनही 2 जागीच विजयी होऊ शकली होती.

सगळ्या विशेष म्हणजे 2014च्या निवडणुकांध्ये भाजपला फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. तर यावेळी मात्र भाजप 11 जागांवर विजय मिळवेल असा दावा करण्यात आला आहे. यावेळी बंगालमध्ये मतदारांची संख्या देखील 16.8 टक्क्यांनी वाढली आहे.

यावेळी एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजावर विश्वास ठेवला तर, भाजप कुठेतरी तृणमूल काँग्रेसच्या जागांवर सुरूंग लावण्यात यशस्वी झाला आहे. 31.86 टक्के मतांनी भाजप 9 जागांवर फायद्यात असल्याचं दिसतं. तर राज्यात सरकार चालवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षात वोट शेअर कमी झाल्याचं पाहायला मिळतं.

2014 मध्ये भाजपला असनसोल आणि दार्जिलिंग या दोन जागांवर यश मिळालं होतं. मालदा दक्षिण, कोलकाता उत्तर आणि कोलकाता दक्षिण या जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना लक्षणीय मतं मिळाली होती. आता पश्चिम बंगालमधल्या किमान अर्ध्या जागा खिशात घालायचं भाजपचं लक्ष्य आहे, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूलला असलेल्या जागा टिकवून ठेवायचं आव्हान आहे.


EXIT POLL VIDEO : शरद पवारांची चिंता खरी ठरणार, अजितदादांना बसू शकतो धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2019 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...