एक्झिट पोलनंतर ही दोन राज्य सरकारं आली संकटात

एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. या दोन्ही राज्यांतली सरकारं संकटात आहेत, असं बोललं जातं.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 03:15 PM IST

एक्झिट पोलनंतर ही दोन राज्य सरकारं आली संकटात

नवी दिल्ली, 21 मे : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये देशात एनडीएचं सरकार येणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजामुळे एनडीएच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. पण त्यासोबतच दोन राज्यांमध्ये जिथे विरोधकांचं सरकार आहे तिथेही ही सरकारं संकटात सापडली आहेत.

मध्य प्रदेश सरकार संकटात

मध्य प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांत बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. मध्य प्रदेशात भाजपने कमलनाथ यांच्या काँग्रेस सरकारवर अल्पमतात असल्याचा आरोप केला आहे. देशात एनडीएचं सरकार आलं तर कमलनाथ यांचं सरकार संकटात येईल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा आहेत. मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या तर भाजपला 109 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 116 जागांची गरज होती. या स्थितीत तिथे काँग्रसेचं सरकार बनलं. पण आता पुन्हा एकदा हे आकड्यांचं गणित बदलू शकतं.

कर्नाटक सरकारही धोक्यात

Loading...

मध्य प्रदेशप्रमाणेच कर्नाटकमध्येही सरकार संकटात आहे, असं बोललं जातं. कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेसचं संयुक्त सरकार आहे पण आता एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर हेही सरकार धोक्यात आलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात बंड केल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्थिर परिस्थिती आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री आर. रोशन बेग यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडराव यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या अत्यंत उद्धट नेते आहेत, असंही म्हटलं आहे. मुस्लिमांनी काँग्रेसच्या पलीकडे जाऊन पाहायला हवं आणि या स्थितीत भाजपचाही स्वीकार करायला हवा, असंही ते म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजप मोठा विरोधी पक्ष आहे. इथे भाजपनेही सरकार बनवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. 23 मे च्या निकालांनंतर या दोन्ही राज्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळतील, अशी शक्यता आहे.

===============================================================================

VIDEO: उद्धव ठाकरेंची प्रताप सरनाईकांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...