Exit Poll 2019 : या राज्यांमध्ये चाणक्यची भाजपला ‘क्लिन स्वीप’

Exit Poll 2019 : या राज्यांमध्ये चाणक्यची भाजपला ‘क्लिन स्वीप’

चाणक्यचा एक्झिट पोल आला असून त्यामध्ये भाजप आघाडी घेताना दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मे : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज येऊ लागले आहेत. वेगवेगळ्या संस्था आणि न्यूज चॅनल्सनी केलेल्या सर्व्हेनुसार भाजपला 2014 प्रमाणे सर्वाधिक जागा मिळत नसल्या तरी एनडीएला मात्र 300 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. 2014मध्ये चाणक्यनं दाखवलेल्या आकडेवारीनुसार भाजप जागा मिळाल्या होत्या. त्यांचा अंदाज खरा ठरला होता. त्यानंतर यावर्षी देखील चाणक्यनं एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले आहेत.

या राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा

चाणक्यच्या अंदाजानुसार छत्तीसगडमधील 11 जागांपैकी भाजपला 9 आणि काँग्रेसला 02 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकमधील लोकसभेच्या 28 जागांपैकी भाजपला 25 तर काँग्रेसला 03 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हरयाणामध्ये मात्र काँग्रेस एकहाती जागा जिंकत असल्याचा अंदाज चाणक्यनं व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील भाजप सर्वच्या सर्व अर्थात 7 जागा जिंकताना दिसत आहे. तर, गुजरातमध्ये देखील भाजप 2014 प्रमाणे कामगिरी करणार असल्याचा अंदाज चाणक्यनं वर्तवला आहे.

NDAचा सत्तेचा मार्ग मोकळा

सर्व एक्झिटपोलनुसार NDAचा सत्तेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. त्यामुळे 2014 प्रमाणे 2019मध्ये देखील मोदी लाट कायम असल्याचं दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...