काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत NDAला बहुमत नाही, भाजपला मिळतील 200 जागा

काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत NDAला बहुमत नाही, भाजपला मिळतील 200 जागा

काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही पक्षांच्या जागांमधलं अंतरही जास्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 मे :  गेली काही दिवस 'एक्झिट पोल'ची देशभर चर्चा सुरू असताना आता काँग्रसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेची बातमी पुढे आलीय. या सर्व्हेमध्येही काँग्रेसपेक्षा भाजप आणि NDAला जास्त जागा दाखवल्या आहेत. मात्र NDAला बहुमत मिळणार नाही असंही त्यातून स्पष्ट झालंय. दोघांमधलं अंतरही जास्त असल्याचं त्यात स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसने केलेल्या सर्व्हेत भाजपला 200 जागा तर NDAला 230 जागा मिळतील असं सांगण्यात आलंय. तर काँग्रेसला 140 तर UPAला 195 जागा मिळतील असं काँग्रेसमधल्या सूत्रांनी सांगितलंय.

पंजाब, केरळ आणि तामिळनाडूत काँग्रेस आणि मित्रपक्ष चांगलं प्रदर्शन करतील असा पक्षाचा अंदाज आहे असं वृत्त आज तकने दिलं आहे.कांग्रेस बिहार, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड आणि हरियाणा चांगली कामगिरी करणार असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे.

या सर्व्हेत UPAला बिहारमध्ये 15, महाराष्ट्र  22 ते 24, तमिलनाडू 34, केरल 15, गुजरात 7, कर्नाटक 11 ते 13, पश्चिम बंगाल 2, मध्य प्रदेश 8 ते 10, हरियाणा 5 ते 6, राजस्‍थान  6 ते 7 जागांवर विजयी होईल असं म्हटलं आहे.

एक्झिट पोलमध्ये NDAची सत्ता

देशातील विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल नुसार पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यात काही राज्यात भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. 2014च्या प्रमाणेच यंदा देखील मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये भाजपला मोठे यश मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

आज तक या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोल नुसार मध्य प्रदेशमधील 29 जागांपैकी भाजपला 26-28 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 1-3 जागा मिळू शकतील. छत्तीसगडमध्ये 11 जागांपैकी भाजपला 7-8 जागा तर काँग्रेसला 3-4 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या राज्यात बसपाला एकही जागा मिळत नसल्याचा अंदाज आहे.

राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागांपैकी 23-25 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 2014 प्रमाणेच भाजपला पुन्हा एकदा राजस्थान घवघवीत यश मिळणार आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजप-सेनेला 38-42 जागा तर आघाडीला 6-10 जागा मिळण्याची शक्यता आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या