मोदी पुन्हा येणार म्हणून शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टीत उसळी!

मोदी पुन्हा येणार म्हणून शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टीत उसळी!

  • Share this:

नवी दिल्ली/मुंबई, 20 मे: लोकसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनंतर केंद्रात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतातील सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर मुंबई शेअर बाजारातील 30 शेअर्सचा निर्देशांक दुपारी 1 हजार 300 अंकांनी वाढून 39 हजार 237 अंकांवर पोहोचला. तर 50 शेअर्सचा निफ्टीचा निर्देशांक 385 अंकांनी उसळी घेत तो 11 हजार 790 अंकांवर पोहोचला. निफ्टीमध्ये मार्च 2016नंतर आलेली ही सर्वात मोठी तेजी आहे. निफ्टीचा एक दिवसातील गेल्या 3 वर्षातील ही सर्वात मोठी तेजी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शेअर बाजारा 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते बाजारात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.

जर एक्झिट पोलनुसार निवडणुकीचा निकाल लागला तर निफ्टी 12 हजारपर्यंत पोहोचेल असे मार्केटमधील तज्ज्ञ उदयन मुखर्जी यांनी सांगितले. मोदी सरकार पुन्हा येणार म्हणूनच शेअर बाजारात तेजी आल्याचे ते म्हणाले. आज दिवसभरात फार्मा, ब्लूचिप, आयटी सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर वाढले.

सेन्सेक्समधील या तेजीमुळे कंपन्यांचे समभाग 1,46,58,709.68 कोटींवरून वाढून ते 1,50,41,099.85 कोटींवर पोहोचले आहेत. यामुळे गुंतवणुकदारांना काही मिनिटातच 3.82 कोटींचा फायदा झाला. बीएसईमधील तेल आणि गॅस कंपन्यांचे शेअर्स देखील वाढले आहेत.

असा आहे एक्झिट पोलचा अंदाज

ABP Nielson

भाजप 267

काँग्रेस 127

महागठबंधन 56

अन्य 84

Republic - CVoter

भाजप 287

काँग्रेस 128

अन्य 127

Republic - Jan ki Baat

भाजप 305

काँग्रेस 124

अन्य 113

News Nation

भाजप 282 - 290

काँग्रेस 118 - 126

अन्य 130 - 138

Times Now- VMR

भाजप 306

काँग्रेस 142

अन्य 94

--

सरासरी

भाजप 291

काँग्रेस 125

अन्य 124

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी है, दुसरी इंदिरा गांधी है...' पाहा UNCUT मुलाखत

First published: May 20, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading