EXIT POLL 2019 : गुजरातमध्ये मोदींचं गारुड कायम; भाजपला 'पैकीच्या पैकी'

EXIT POLL 2019 : गुजरातमध्ये मोदींचं गारुड कायम; भाजपला 'पैकीच्या पैकी'

News18 आणि IPSOS यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये गुजरातच्या 25 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मे : लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपला गुजरातमधल्या सर्वच्या सर्व 26 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. न्यूज18 आणि IPSOS यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये गुजरातच्या 25 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मोदी लाटेची सुरुवात याच राज्यातून झाली होती. आता 2019 मध्ये मोदींच्या या राज्यानं त्यांना 'हात' न दाखवता हात दिला आहे, असं एक्झिट पोल्समधून दिसतं. गुजरातमध्ये राज्याच्या स्थापनेपासूनचं सर्वाधिक मतदान यंदा झालं आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा सत्ताधारी भाजपलाच झाला हे या निकालाच्या अंदाजावरून दिसतं.

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत 64.11% इतकं मतदान झालं. हे मतदान आतापर्यंतचं सर्वाधिक आहे. पण दोन्ही प्रमुख पक्षांनी याचा फायदा आपल्याला होईल असा दावा केला आहे. मोदींची लोकप्रियता वाढली असून त्यामुळेच मोदींना निवडून देण्यासाठी गुजराती बांधव मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी उतरले, असं म्हणत भाजपने विजयाचा दावा केला होता. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. त्यामुळे सत्तेविरोधात मतदान करायला जनता उतरली, असं काँग्रेसनं सांगत मोदी लाट ओसरली असल्याचा दावा केला.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने शत प्रतिशत भाजपचा दावा खरा करून दाखवला होता. 2009 मध्ये गुजरात विधानसभेत सत्तेवर असताना मोदी मुख्यमंत्री होती. त्या वेळी भाजपला 26पैकी 15 जागा जिंकता आल्या होत्या. 11 जागा काँग्रेसकडे होत्या. त्या अगोदर 2004 च्या निवडणुकीत 14 जागा भाजपकडे होत्या. 12 जागा काँग्रेसकडे होत्या.

मतदारांची संख्या

एकूण मतदार 4,47,69,985

पुरुष मतदार 2,32,80,542

महिला मतदार 2,14,88,390

अन्य 1,053

उत्तर गुजरात, सौराष्ट्र, मध्य गुजरात, दक्षिण गुजरात असे सर्वसाधारण प्रभाग असणाऱ्या या राज्यात सर्वच भागात मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे त्याचा नेमका फायदा कुणाला झाला ते 23 मेच्या अंतिम निकालात कळेल. गांधीनगरमधून अमित शहांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे या जागेकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवाय सुरत, वलसाड, कच्छ या मतदारसंघांच्या लढतींकडेही लक्ष आहे.

First Published: May 19, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading