मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा आता संपत आला आहे. 7 टप्प्यांमध्ये झालेला लोकशाहीचा हा महोत्सव आता अंतिम टप्प्यात आला असून 23 तारखेच्या निकालांची प्रतीक्षा आहे. पण त्या अगोदर या निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो याचा अंदाज देणारे एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कोणत्याही एक्झिट पोल्सचे निकाल संध्याकाळी 6.30 च्या आज प्रसिद्ध करता येणार नाहीत. त्यामुळे संध्याकाळनंतरच News18 ने केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल आम्ही देऊ.
लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. यात लोकसभेच्या 543 जागांपैकी 199 जागांची निवड करण्यात आलीय. देशातल्या 28 राज्यांमधल्या 199 मतदारसंघातल्या 796 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कौल घेण्यात आलाय. यात 4776 मतदान केंद्रातून 25 मतदारांची निवड करण्यात आली.
2014च्या मोदीलाटेनंतर आता 2019 ला परिस्थिती बदलणार की मोदी लाट कायम राहणार? हे लवकरच स्पष्ट होईल. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीला 282 मिळाल्या होत्या. 31.04 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडलेली होती. काँग्रेसचा सपशेल पराभव झाला होता. त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या.
काय होती महाराष्ट्रातली परिस्थिती?
महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागा भाजप-सेना युतीला मिळाल्या होत्या. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला फक्त 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. 47.9 टक्के वोट शेअर युतीला मिळाल्या होत्या.
SPECIAL REPORT: मोदींनी तप केलेल्या गुहेत 'हे' शुल्क देऊन तुम्हीही करू शकता ध्यानधारणा