Exit Poll 2019 : कर्नाटकमध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट

कर्नाटकमध्ये भाजपला 21 ते 23 जागा मिळतील, असं नेटवर्क 18 चा सर्व्हे सांगतो. काँग्रेस आणि मित्रपक्षांना 3 ते 5 जागा मिळतील. जेडीएसला 1 ते 3 जागा मिळतील, असा अंदाज आहे. इथे भाजपने चांगलं यश मिळवलं.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 08:30 PM IST

Exit Poll 2019 : कर्नाटकमध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट

बंगळुरू, 18 मे : कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुका झाल्या. या राज्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढत होती. इथे भाजपला 21 ते 23 जागा मिळतील, असं नेटवर्क 18 चा सर्व्हे सांगतो. काँग्रेस आणि मित्रपक्षांना 3 ते 5 जागा मिळतील. जेडीएसला 1 ते 3 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार असलं तरी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपनेच मुसंडी मारली आहे.कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसकडे 9 जागा होत्या तर जनता दल सेक्युलर या पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या.

राजकीय गणितं बदलणार ?

कर्नाटकमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमुळे इथे राजकीय गणितं बदललेली पाहायला मिळाली. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस आणि जेडीएस यांचं संयुक्त सरकार आहे.

कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपला जोरदार यश मिळेल, असा दावा केला होता. या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर पक्षात मतभेद होतील, असंही त्यांचं म्हणणं आहे. भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये इथे जोरदार चुरस पाहायला मिळाली.

Loading...

फिर एक बार मोदी सरकार

विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजपचं स्वबळावर सरकार स्थापनेचं स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही, असं बहुतेक एक्झिट पोल मध्ये वर्तवलेल्या अंदाजावरून स्पष्ट झालं. दोन प्रमुख एक्झिट पोलमध्ये रालोआला 300 च्या जागा देण्यात आल्या आहेत.

======================================================================================

EXIT POLL VIDEO : सुळे की कुल, खैरे की जलील; कोण जिंकणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 08:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...