Exit Poll 2019 : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठं यश; तर आपचा सुफडा साफ

पंजाबमध्ये मात्र आम आदमी का हात काँग्रेसके साथ अशीच स्थिती आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 08:16 PM IST

Exit Poll 2019 : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठं यश; तर आपचा सुफडा साफ

चंडीगड, 18 मे : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यानंतर आता एक्झिट पोल आले असून पंजाबमध्ये मात्र काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. TIMES NOW-VMRच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 10 जागा मिळत आहे. तर, भाजप - शिरोमणी अकाली दलाला 03 जागा मिळणार असल्याचा अंदाज TIMES NOW-VMRच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर, आपला मात्र एकही जागा मिळताना दिसत नाही. हा आम आदमी पक्षाला मोठा धक्का आहे. कारण, 2014च्या मोदी लाटेत देखील आपनं 4 जागी विजय मिळवला होता. एकंदरीत आत्तापर्यत विविध चॅनल्सनी वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण, पंजाबमध्ये मात्र आम आदमी का हात काँग्रेसके साथ अशीच स्थिती आहे. 2014ची तुलना करता 2019च्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवाय, पंजाबच्या निकालाकडे विशेष लक्ष देखील आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. तर, लोकसभेमध्ये कॅप्टन अमरिंदर फॅक्टर चालला असा अंदाज एक्झिट पोलमध्ये तरी दिसून येत आहे.


Exit Poll 2019 : या राज्यांमध्ये चाणक्यची भाजपला ‘क्लिन स्वीप’

काय होती 2014मध्ये स्थिती

2014मध्ये पंजाबमधील 13 पैकी 4 जागांवर आपनं विजय मिळवला होता. शिरोमणी अकाली दलानं 4, भाजपनं 2, काँग्रेसनं 3 आणि भाजपनं दोन जागांवर विजय मिळवला होता. तर, 2017मध्ये गुरूदासपूर इथं झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या गुरूजीत सिंग औजला यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ आता 4 आहे.

Loading...

2014मध्ये लागले धक्कादायक निकाल

2014मध्ये भाजपला पंजाबमध्ये न मिळालेला विजय म्हणजे धक्काच म्हणावा लागेल. शिवाय, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना देखील परभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. अरूण जेटली यांचा अमृतसर या लोकसभा मतदार संघातून पराभव झाला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग हे यावेळी जायंट किलर ठरले होते. अमरिंदर सिंग यांनी अरूण जेटली यांचा 1 लाख 27 हजार 770 मतांनी पराभव केला होता. अमरिंदर सिंग यांना 4 लाख 82 हजार 876 मतं मिळाली होती. तर, अरूण जेटली यांना 3 लाख 80 हजार 106 मतं मिळाली होती. मोदी लाटेत देखील अरूण जेटली यांचा झालेला पराभव हा धक्कादायक असाच होता.

विधानसभेत काँग्रेसला पसंती

विधानसभा निवडणुकीमध्ये पंजाबनं काँग्रेसच्या हातात सत्ता दिली. कॅप्टर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला मिळालेला विजय हा उभारी देणारा असाच आहे. कारण, विधानसभेच्या 117 जागांपैकी काँग्रेसनं 77, शिरोमणी अकाली दल 18, भाजप 3 आम आदमी पक्षाला 20 तर लोक इन्साफ पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या.

भाजपनं 3 जागी दिलेत उमेदवार

शिरोमणी अकाली दलासोबत भाजपनं मैत्रि केली असून शिरोमणी अकाली दल 10 आणि भाजपनं 3 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...