VIDEO : 'एक्झिट पोल'ने बिथरले विरोधक, बिहारच्या या नेत्याने दिली शस्त्र हातात घेण्याची धमकी

VIDEO : 'एक्झिट पोल'ने बिथरले विरोधक, बिहारच्या या नेत्याने दिली शस्त्र हातात घेण्याची धमकी

'लोकांचा आक्रोश हा अतिशय वाईट असतो. रस्त्यावर रक्त सांडू शकते. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी तयार राहिलं पाहिजे.'

  • Share this:

पाटणा 21 मे : रविवारी संपलेल्या मतदानानंतर 'एक्झिट पोल' जाहीर झाले आणि विरोधी पक्षांची झोपच उडाली. जाहीर झालेल्या सर्वच पोल्समध्ये भाजप आणि एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे सत्तेत येण्याची आस लावून बसलेल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झालाय. त्यामुळे बिथरलेल्या बिहारच्या नेत्याने चक्क शस्त्रच हातात घेण्याचं आवाहन केलं.

'एक्झिट पोल'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भुमिका स्पष्टकरण्यासाठी पाटण्यात आज पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी सर्व एक्झिट पोल हे खोटे असल्याचं सांगितलं. पहिले बुथ लुटण्यात आले, आता निकालांची लूट करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. अशा वेळी गरज पडली तर महाआघाडीच्या नेत्यांनी शस्त्र हातात घेण्यास मागेपुढे पाहु नये असं आवाहनही त्यांनी केलं.

कुशवाह एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, लोकांचा आक्रोश हा अतिशय वाईट असतो. रस्त्यावर रक्त सांडू शकते. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. असं काही झालं तर त्यासाठी एनडीएचे नेतेच जबाबदार असतील. कुशवाह यांच्या या भुमिकेवर टीका होत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जनतेने आणि कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षेसाठी काम करावं. मतमोजणीच्या आधी या यंत्रांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता आहे अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading