Exit Poll 2019 : अमेठी की रायबरेली? काँग्रेसची एक जागा धोक्यात

लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी सरकार येणार, असं बोललं जात आहे. यासोबतच काँग्रेससाठी मात्र एक धक्कादायक बातमी आहे. ही बातमी आहे, उत्तर प्रदेशातून. अमेठी किंवा रायबरेली यामधली एक जागा काँग्रेस गमावू शकतं, असा अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 06:07 PM IST

Exit Poll 2019 : अमेठी की रायबरेली? काँग्रेसची एक जागा धोक्यात

नवी दिल्ली,21 मे :लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी सरकार येणार, असं बोललं जात आहे. यासोबतच काँग्रेससाठी मात्र एक धक्कादायक बातमी आहे. ही बातमी आहे, उत्तर प्रदेशातून.

यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींनी यावेळी रायबरेलीमधून निवडणूक लढवली तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून लढले. हे दोन्ही मतदारसंघ उत्तर प्रदेशात आहेत आणि या राज्यातल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला फक्त एक किंवा दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे.

सोनिया गांधी की राहुल गांधी?

याचाच अर्थ या अंदाजांनसार राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना आपली जागा गमवावी लागू शकते. ही जागा अमेठी असू शकते किंवा रायबरेलीसुद्धा. त्यातही राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी अशी तगडी लढत अमेठीमध्ये असल्यामुळे ही जागा जास्त धोक्यात आहे, असं म्हटलं जातं.

वायनाड सुरक्षित जागा

Loading...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीसोबतच केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवली. त्याचवेळी स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आपण अमेठीत हरणार हे राहुल गांधींना माहीत होतं म्हणून त्यांनी वायनाडच्या सुरक्षित जागेकडे धाव घेतली, असं स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.

सोनिया गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवत आहेत. तिथे मायावती आणि अखिलेश यादव यांच्या आघाडीने उमेदवारच उतरवलेला नाही. त्यामुळे सोनिया गांधींना तुलनेने कमी धोका आहे, असा अंदाज आहे. सोनियांच्या विरोधात भाजपने आधी काँग्रेसमध्येच असलेले दिनेश प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांना अगदी 15 दिवस आधी भाजपने रिंगणात उतरवलं होतं. तेव्हा राहुल गांधी एक लाखाच्या मताधिक्याने जिंकले होते. आता मात्र स्मृती इराणीही जय्यत तयारीनिशी अमेठीच्या मैदानात उतरल्या होत्या.

ही सगळी स्थिती पाहता एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. काँग्रेस अमेठी आणि रायबरेली हे आपले पारंपरिक गड राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

==========================================================================

SPECIAL REPORT : महाराष्ट्रातील एक्झिट पोल काय सांगतोय, 'परिवर्तन' नेमकं कुणाचं होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...