VIDEO : Exit Pollच्या निकालांचं खुद्द भाजप समर्थकांनाही आश्चर्य!

VIDEO : Exit Pollच्या निकालांचं खुद्द भाजप समर्थकांनाही आश्चर्य!

भाजप आणि NDAला एवढ्या जागा मिळतील असं त्यांच्या अनेक समर्थकांनाही वाटलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर रविवारी Exit Poll जाहीर झाले. त्यानंतर सगळीकडेच चर्चा सुरू झाली ती Exit Pollची जवळपास सर्वच पोल्समध्ये 'फिर एक बार मोदी सरकार' हाच सूर दिसून आला. 2014 च्या तुलनेत भाजपच्या थोड्या जागा कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी NDAला मात्र बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. Exit Pollsमध्ये जे आकडे दाखवले जात आहेत ते पाहुन खुद्द भाजपसमर्थकांनाही आश्चर्य वाटत असल्याचं मत जेष्ठ पत्रकार शरद प्रधान यांनी व्यक्त केलं. सीएनबीसी आवाजच्या चुनाव अड्डा या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातल्या सात टप्प्यांमध्ये प्रत्येक टप्प्यात भाजपने आपला अजेंडा सेट केला होता. त्या मागे इतर पक्षाला जावं लागलं. प्रत्येक टप्प्यातली राज्य, त्यांचं गणित, लोकांचा कल, प्रचारातले विषय अशा सगळ्या गणितांचा विचार करून भाजपने रणनीती बनवली त्याचा त्याला फायदा होत असल्याचं दिसतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दीर्घ टप्प्याचा विचार करून योजना बनवली होती. प्रत्येक दिवसांचं त्यांचं प्लॅनिंग होतं. केव्हा काय आणि कुठल्या गोष्ट करायच्या याचं त्यांना व्हिजन होतं. तर विरोधी पक्ष विस्कळीत दिसत होता. त्यामुळे ते आपली प्रतिमा निर्माण करू शकले नाहीत.

सुरूवातीला विरोधकांची एकी दिसून येत होती. मात्र नंतर जस जशी निवडणूक जवळ येत होती तसं त्यांच्यातले मतभेद वाढले. सर्व विरोधक एकत्र आले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती. तर भाजपने सर्व धोक्यांचा विचार करून योजना आखली. बालाकोटच्या हवाई हल्ल्यांनंतर परिस्थिती बदलली. मात्र ज्या गांभीर्याने नियोजन करायला पाहिजे ते विरोधी पक्षांकडून झालं नाही.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनंतर केंद्रात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतातील सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर मुंबई शेअर बाजारातील 30 शेअर्सचा निर्देशांक दुपारी 1 हजार 300 अंकांनी वाढून 39 हजार 237 अंकांवर पोहोचला. तर 50 शेअर्सचा निफ्टीचा निर्देशांक 385 अंकांनी उसळी घेत तो 11 हजार 790 अंकांवर पोहोचला. निफ्टीमध्ये मार्च 2016नंतर आलेली ही सर्वात मोठी तेजी आहे. निफ्टीचा एक दिवसातील गेल्या 3 वर्षातील ही सर्वात मोठी तेजी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शेअर बाजारा 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते बाजारात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.

जर एक्झिट पोलनुसार निवडणुकीचा निकाल लागला तर निफ्टी 12 हजारपर्यंत पोहोचेल असे मार्केटमधील तज्ज्ञ उदयन मुखर्जी यांनी सांगितले. मोदी सरकार पुन्हा येणार म्हणूनच शेअर बाजारात तेजी आल्याचे ते म्हणाले. आज दिवसभरात फार्मा, ब्लूचिप, आयटी सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर वाढले.

सेन्सेक्समधील या तेजीमुळे कंपन्यांचे समभाग 1,46,58,709.68 कोटींवरून वाढून ते 1,50,41,099.85 कोटींवर पोहोचले आहेत. यामुळे गुंतवणुकदारांना काही मिनिटातच 3.82 कोटींचा फायदा झाला. बीएसईमधील तेल आणि गॅस कंपन्यांचे शेअर्स देखील वाढले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 09:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading