Elec-widget

Exit Poll 2018 : बिहारमध्ये काय आहे एक्झिट पोलचा अंदाज

Exit Poll 2018 : बिहारमध्ये काय आहे एक्झिट पोलचा अंदाज

बिहारच्या जनतेनं देखील एनडीएच्या पारड्यात मत टाकल्याचं दिसून येत आहे.

  • Share this:

पाटणा, 18 मे : बिहारमधील देखील लोकसभा निवडणूक एक्झिट पोलचे अंदाज आता वर्तवण्यात आले आहेत. News24TodaysChanakyaच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बिहारमध्ये 36 तर, काँग्रेसला 08 जागा आणि इतर पक्षांना 1 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लोकसभेच्या 40 जागा असलेल्या बिहारमध्ये 6 जागा या शेड्युल्ड कास्टसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. बिहारमध्ये मतदारांची संख्या ही 7,07,43,593 असून त्यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 3,74,41,954 तर, महिला मतदारांची संख्या 3,32,99,233 इतकी आहे. 2014मध्ये बिहारमध्ये भाजपला 22 जागांवर विजय मिळाला होता. तर, लोक जनशक्ती पक्षानं 4, राष्ट्रीय जनता दलानं 4 काँग्रेसनं 2, आणि इतरांना 8 जागांवर विजय मिळाला होता. पण, REPUBLIC - C VOTERच्या सर्व्हेनुसार एनडीएला बिहारमध्ये 40 तर, काँग्रेसला 07 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विधानसभेची सदस्य संख्या 244 असलेल्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार हे असून 2015मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे विषेशता पश्चिम बिहार, पूर्व बिहार, उत्तर बिहार, दक्षिण बिहार आणि मध्य बिहार असे भाग पडतात.

जागा वाटपात भाजपला सेट बॅक

2014मध्ये भाजपनं लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या होत्या. पण, त्यानंतर 2019मध्ये लोकसभेकरता सीट वाटप करताना भाजप बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायाला मिळालं. कारण, बिहारमध्ये देखील लोकसभेच्या जागा वाटप करताना भाजपनं जदयू समोर अर्थात नितीश कुमार यांच्यापुढे नमतं घेतलं. नव्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी जदयू 17, भाजप 17 आणि रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 6 जागा लढवेल असा फॉर्म्युला ठरला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 22, लोकजशक्ती पार्टीला 6 आणि भाजपविरोधात लढणाऱ्या जदयूला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.

काँग्रेस – आरजेडी एकत्र

Loading...

लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेस – आरजेडी एकत्र निवडणूक लढत आहेत. RJD प्रमुख लालू प्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणात जेलमध्ये आहेत. पण, जातीच्या राजकारणाचा विचार करता दोन्ही पक्षांकडे मागासवर्गीयांची मतं वळू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

बिग फाईट

बिहारमध्ये पाटणा आणि बेगूसराय ही लढत लक्षवेधी आहे. कारण, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा पाटणामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, बेगूसरायमधून सीपीआयएमनं जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार मैदानात आहेत. 2014च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे भोला सिंह निवडून आले होते. पण, 2019मध्ये मात्र भाजपनं हिंदुत्ववादाचा चेहरा अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

स्वतः कन्हैय्या कुमारने बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावी संघटना एकत्र आली तर मी नक्कीच निवडणूक लढवेन असे सांगितले होते. त्याच्या म्हणण्यानुसार महाआघाडी झाली असून कन्हैय्या कुमारही आता लोकसभेत आपलं सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढवताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...