कशी सुरू आहे राममंदिर भूमिपूजनाची तयारी? पाहा अयोध्येचा Exclusive Video

कशी सुरू आहे राममंदिर भूमिपूजनाची तयारी? पाहा अयोध्येचा Exclusive Video

5 ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, त्याआधीच अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे

  • Share this:

लखनऊ, 2 ऑगस्ट : अवघ्या दोन दिवसात अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे मोठी तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमात हजर राहणार नाही.

आताच हाती आलेल्या माहितीनुसार अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहणार येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे अयोध्याच्या राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अधिकच काळजी घेण्याची गरज आहे. यादरम्यान अयोध्याच्या कार्यक्रमाच्या तयारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनादरम्यान एका कार्यक्रमाच्या तयारीचा, मंडप सजावटीचा हा Exclusive Video समोर आला आहे.

येत्या दोनच दिवसात अयोध्यात राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी कमीतकमी पाहुण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

हे वाचा-BREAKING : गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात हलवलं

अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीनंतर उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. दरम्यान अयोध्येतील या व्हिडीओमध्ये मंडपाच्या स्टेजवर गर्दी पाहायला मिळत आहे. येथे कार्यक्रमाच्या तयारीची आखणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 2, 2020, 6:46 PM IST
Tags: Ayodhya

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading