मराठी बातम्या /बातम्या /देश /

Exclusive: पाकिस्तानचे पुन्हा ‘मिशन काश्मीर’? निवृत्त आयएसआय अधिकाऱ्याने सांगितली टेरर ब्लू प्रिंट

Exclusive: पाकिस्तानचे पुन्हा ‘मिशन काश्मीर’? निवृत्त आयएसआय अधिकाऱ्याने सांगितली टेरर ब्लू प्रिंट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पाकिस्तानने ‘मिशन काश्मीर’ (Mission Kashmir) पुन्हा सुरू केलं आहे का? या हल्ल्यांमागे पाकिस्तान आहे की आणखी कोणी? इस्लामिक स्टेट विलायाह हिंद (ISHP) ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयचाच भाग तर नाही? या सर्व प्रश्नांबाबत न्यूज 18 ने एका निवृत्त आयएसआय अधिकाऱ्याशी (Retired ISI officer) चर्चा केली.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Indian Telephone Industry

नवी दिल्ली, 20 जुलै : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवादी हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे होण्यामागे काय कारण असू शकतं याचा विचार केल्यास काही प्रश्न समोर येतात. पाकिस्तानने ‘मिशन काश्मीर’ (Mission Kashmir) पुन्हा सुरू केलं आहे का? या हल्ल्यांमागे पाकिस्तान आहे की आणखी कोणी? पाकिस्तान-अफगाण सीमेवर एखादी नवी दहशतवादी संघटना उभी राहिली आहे का? इस्लामिक स्टेट विलायाह हिंद (ISHP) ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयचाच भाग तर नाही? या सर्व प्रश्नांबाबत न्यूज18 ने एका निवृत्त आयएसआय अधिकाऱ्याशी (Retired ISI officer) चर्चा केली. या अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पाकिस्तानची टेरर ब्लू प्रिंट (Pakistan Terror Blueprint) उघड केली. या अधिकाऱ्याने बॉर्डरवर (Line of Control) जवळपास सर्वच सेक्टरमध्ये काम केले आहे.

2008च्या मुंबई हल्ल्यानंतर

या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयने ‘मिशन काश्मीर’ पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. 2008 साली मुंबईमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांनंतर (Mumbai Terror attacks) पाकिस्तानवर जगभरातून मोठा दबाव आला होता. त्यामुळे आयएसआयचे भारत आणि काश्मीरमधील नियंत्रण संपुष्टात आले होते. “आमच्या देशाची आर्थिक स्थिती ठीक नाही, शिवाय फायनॅन्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅकलिस्टमध्ये (FATF Black list) जाण्याचाही धोका आहे. त्यामुळे आमचाही निधी सध्या मर्यादित आहे. काश्मीर आणि भारतात आयएसआय हे पूर्वी 80 हून अधिक मिशन राबवत होते. मात्र, 26/11च्या हल्ल्यांनंतर आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शुजा पाशा यांनी यातील बरेच मिशन्स आणि निधी बंद केले. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व युद्ध हरली आहेत. ऑगस्ट 2021मध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतरही बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आम्ही असहाय्य आहोत.” असं या अधिकाऱ्याने सांगितलं.

नवीन गटाची स्थापना

या अधिकाऱ्याने सांगितले की आयएसआय लष्कर-ए-तोयबा (LeT), जौश मोहम्मद (JeM), ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चे (TTP) काही पाकिस्तान समर्थक आणि अशा इतरांना इस्लामिक स्टेट वालियाह हिंदसोबत (ISHP) एकत्र घेऊन एक नवा गट तयार करत आहे. यातील टीटीपी हा या नवीन गटात सहभागी होण्यास टाळाटाळ करत आहे, कारण त्यांना लढाई नको आहे. दुसरीकडे आयएसआय मात्र ‘जिहाद-ए-अझीम’साठी जम्मू-काश्मीरवर हल्ला करण्याच्या प्रस्तावावर भर देत आहे. टीटीपी-पाकिस्तान शांतता करार हा कित्येक चर्चांनंतरही या एका कारणामुळेच रखडला आहे; अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

हे वाचा - अल्वा असताना शिवसेनेवर अन्याय, शेवाळेंनी करून दिली आठवण, 17 वर्षांपूवी काय झालं?

चीनचं बारीक लक्ष

‘आयएसएचपी’ला जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यासाठी टार्गेट नेमून दिले आहेत. चीनदेखील या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून आहे. भारताला अफगाणिस्तान आणि काश्मीर अशा दोन्ही आघाड्यांवर अडकवून ठेवण्यासाठी चीनदेखील कारवाया करण्यास उत्सुक आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हो वाचा -  महिलांना लाँग कोविड होण्याची शक्यता अधिक; संशोधनात दिसून आली 'ही' लक्षणं

अशी मिळवतायत फंडिंग

या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना सध्या सदस्यांची वडिलोपार्जित संपत्ती विकून पैसे मिळवत आहेत. काश्मीरमधील सोपोरे, कुपवाडा आणि इतर लहान गावांमध्ये असलेली दहशवाद्यांची घरे-जमीनी विकली जात आहेत. ते दहशतवादी पाकिस्तानात राहून काम करत असल्यामुळे त्यांच्या परत येण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे इथली संपत्ती विकून, त्यातून य़ेणारा पैसा जिहादच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी संघटनांना पुरवला जात आहे.

“जिहाद आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली आयएसआयने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी कित्येक काश्मिरी तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे.” असंही या अधिकाऱ्याने मुलाखतीत सांगितले.

First published:

Tags: India, Jammu kashmir, Pakistan