बालाकोटचे पुरावे ते राम मंदिर.... सडेतोड प्रश्नांवर मोदींनी दिली उत्तरं

बालाकोटचे पुरावे ते राम मंदिर.... सडेतोड प्रश्नांवर मोदींनी दिली उत्तरं

नेटवर्क18 ला दिलेली मोदींनी दिलेली ही खास मुलाखत मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता प्रसारित केली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : बालाकोटचे पुरावे तुम्ही जगापुढे आणणार का? मसूद अझहर भारताच्या ताब्यात दिला जाईल असं वाटतं का? यापासून ते राफेल प्रकरण, राम मंदिर, प्रियांका गांधी, मायावती, अर्थव्यवस्था, चीन अशा अनेक सडेतोड प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलखुलास चर्चा केली. नेटवर्क18 ला दिलेली मोदींनी दिलेली ही खास मुलाखत मंगळवारी प्रसारित केली जाणार आहे. न्यूज18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीत मोदींनी भाजपचा जाहीरनाम्यापासून राहुल गांधींपर्यंत अनेक विषयांवरच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

गेल्या पाच वर्षांत न्यूज18ला पंतप्रधान मोदींनी दिलेली ही दुसरी मोठी मुलाखत आहे. भारतीय जनता पक्षाने सोमवारीच आपला जाहीरनामा सादर केला. याविषयीसुद्धा मोदी सविस्तर बोलले आहेत. आपल्याकडे बालकोटचे नाकारता येणार नाहीत असे पुरावे खरंच आहेत का? असतील तर ते जनतेपुढे आणणार का? यावरही मोदींनी उत्तर दिलं आहे.

चीनबद्दलच्या व्यापाराविषयी मोदींचं मत काय, AFSPA किंवा लष्कराला दिलेले विशेषाधिकार, काश्मीर प्रश्न याविषयी नरेंद्र मोदी यांची मतं काय हेसुद्धा या मुलाखतीमधून उलगडणार आहे.

भाजपची मै भी चौकीदार ही प्रचार मोहीम सध्या गाजते आहे. ही कल्पना कुणाची याचंही उत्तर मोदींन दिलं आहे. मोदींना पंडित नेहरूंविषयी काय वाटतं याशिवाय मोदी खरंच गांधी घराण्याचा तिरस्कार करतात का, असे थेट प्रश्न राहुल जोशी यांनी मोदींना विचारले आहेत.

ही मुलाखत नेटवर्क18च्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 10 वाजता प्रसारित केली जाणार आहे. न्यूज18लोकमतच्या वेबसाईटवरही याचं प्रसारण होईल.

 

First published: April 9, 2019, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading