मराठी बातम्या /बातम्या /देश /

Exclusive Interview | शंका नाही, ना आव्हान नाही, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत BJP पार करेल 350 जागा: योगी आदित्यनाथ

Exclusive Interview | शंका नाही, ना आव्हान नाही, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत BJP पार करेल 350 जागा: योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (UP Assembly Elections) लवकरच होऊ घातल्या आहेत. त्या निमित्ताने, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांची न्यूज 18 डॉट कॉमने Exclusive मुलाखत (Exclusive Interview) घेतली.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (UP Assembly Elections) लवकरच होऊ घातल्या आहेत. त्या निमित्ताने, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांची न्यूज 18 डॉट कॉमने Exclusive मुलाखत (Exclusive Interview) घेतली.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (UP Assembly Elections) लवकरच होऊ घातल्या आहेत. त्या निमित्ताने, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांची न्यूज 18 डॉट कॉमने Exclusive मुलाखत (Exclusive Interview) घेतली.

पुढे वाचा ...

उत्तर प्रदेश, 10 डिसेंबर: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (UP Assembly Elections) लवकरच होऊ घातल्या आहेत. त्या निमित्ताने, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांची न्यूज 18 डॉट कॉमने Exclusive मुलाखत (Exclusive Interview) घेतली. आपल्या सरकारने राज्यासाठी आणि राज्यातल्या नागरिकांसाठी केलेल्या कामांमुळे आपल्याला विजयाचा विश्वास असल्याचं आणि कोणतंही आव्हान समोर नसल्याचं त्यांनी सांगितलं. सीएनएन-न्यूज18चे वरिष्ठ संपादक (पॉलिटिक्स) आणि न्यूज 18चे दिल्लीतील ब्यूरो चीफ अमन शर्मा (Aman Sharma) यांनी ही मुलाखत घेतली.

निवडणुकीपूर्वी मोहम्मद अली जिना (Jinnah) यांचा विषय काढून ध्रुवीकरणाचा (Polarisation) प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत असल्याचं सांगून त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. तसंच, प्रियंका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi-Vadra) यांच्याकडून केल्या जाणाऱ्या इलेक्शन टुरिझमचा (Election Tourism) काँग्रेसला (Congress) काही फायदा होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. लखीमपूर-खेरी प्रकरणात (Lakhimpur Kheri) कोणालाही पाठीशी घातलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या मुलाखतीचा संपादित अंश

- उत्तर प्रदेशातल्या आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी (BJP) किती मोठं आव्हान आहे? वास्तविक या राज्यात दीर्घ काळापासून कोणत्याच पक्षाला सलग दोन वेळा सत्ता राखणं जमलेलं नाही. तरीही 300 जागांचा टप्पा ओलांडण्याचा दावा तुमच्या पक्षाकडून केला जात आहे. या आत्मविश्वासामागचं कारण काय?

हेही वाचा-  जीवन मरणाचा लढा देत असलेल्या ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांचं हे पत्र होतंय VIRAL

 - 403 जागांपैकी 350हून अधिक जागा भाजपला मिळतील, याबाबत कोणतीही शंका नाही. कारण 2017मध्ये आम्ही लोककल्याण संकल्प पत्रातून दिलेलं प्रत्येक आश्वासन आमच्या सरकारने पूर्ण केलं आहे. 2017पूर्वी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे बीमारू राज्य म्हणून ओळखलं जायचं. आता त्याची ओळख विविध क्षेत्रांतल्या विकासासाठी आहे. गेली साडेचार वर्षं आमच्या सरकारने राज्याच्या विकासासाठी आणि 24 कोटी नागरिकांसाठी काम केलं. आम्ही आमच्या राज्यासाठी आणि राज्यांच्या नागरिकांसाठी केलेल्या कामामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यामुळे आमच्यापुढे कोणाचं आव्हान आहे असं आम्हाला वाटत नाही. आम्ही शेतकरी, महिला आणि राज्यातल्या गरिबात गरीब व्यक्तीच्या कल्याणासाठी काम केलं. 2017मध्ये आम्ही शेतकऱ्यांची 36 हजार कोटी रुपयांची कर्जं माफ केली. त्याचा लाभ 2.1 कोटी शेतकऱ्यांना झाला. भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी उत्तर प्रदेश यापुढे महत्त्वाची भूमिका निभावेल.

- तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक (Election) लढणार आहात? विकास, कायदा-सुव्यवस्था (Law & Order) की गुंतवणूक? या मुद्द्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेशची प्रतिमा सुधारली आहे, असं तुम्हाला वाटतंय का?

- 2017पासूनच आम्ही 'रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म' यावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही राज्याबद्दलची धारणा बदलण्यास मदत झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था स्थिर राखल्यामुळे उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मिळवण्यास मदत झाली. पूर्वी उद्योजकांचा छळ करणाऱ्या आणि त्यांना त्रास देणाऱ्या ज्या टोळ्या होत्या, त्यांच्यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे कडक कायदा आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसायांसाठी राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे आणि ते पुढेही राहील. त्यामुळे सॅमसंग, रिलायन्स आणि मायक्रोसॉफ्टसारखे ग्लोबल ब्रँड्स आणि अन्य नामवंत ब्रँड्स राज्यात उद्योग उभारत आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळून राज्यात विक्रमी 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) झाली आहे. त्यापैकी अवजड उद्योगांत जवळपास पाच लाख कोटी आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांत जवळपास पाच लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे राज्यातील 30 लाखांहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा- क्रूरतेचा VIDEO..! निरागस मुलं रडत राहिलं कुशीत, पोलीस करत होते बापाला मारहाण

 - तुम्ही केलेल्या बुलडोझरच्या वापरावर अखिलेश यादव यांनी टीका केली असून, तुमच्यावर अनेकदा वैयक्तिक टीकाही केली आहे.

- आम्ही भ्रष्ट, गुन्हेगार आणि गँगस्टर्सविरोधात बुलडोझर वापरले. जर अखिलेश यादव यांना बुलडोझरच्या वापराबद्दल काही आक्षेप असतील, तर त्यांना गुन्हेगार आणि गँगस्टर्सबद्दल असलेली सहानुभूती दिसून येते. या गुन्हेगारांनी गरिबांचा वर्षानुवर्षं छळ केला. आधीच्या सरकारांचे प्राधान्यक्रम वेगळे होते. आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते कायमच माफियांना पाठिंबा द्यायचे. त्यामुळे गरीब व्यक्ती, उद्योजक आणि व्यापारी यांचा छळ झाला. त्याचा विपरीत परिणाम नव्या गुंतवणुकीवरही झाला. दरडोई उत्पन्नाने नीचांकी पातळी गाठली. विकासदर घटला आणि बेरोजगारीचा दर उच्च होता.

आम्ही ही परिस्थिती 360 अंशांत सुधारली आहे. आम्ही माफियांविरोधात कडक पावलं उचलली आणि झीरो टॉलरन्स पॉलिसी (Zero Tolerance Policy) अर्थात अजिबात खपवून न घेण्याचं धोरण राबवलं. समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) काहीच केलेलं नसल्यामुळे ते पाठिंबा मिळवण्यासाठी माफियांच्या पाठीशी उभे राहत आहेत; पण बहुमत या सगळ्याच्या विरोधात आणि आम्हाला नागरिकांचा पाठिंबा मिळेल.

- अखिलेश यादव (Akhilesh Yadav) असाही आरोप करतात, की या सरकारने स्वतःचं असं नवं काही केलं नाही. केवळ मागच्या सरकारांचे प्रकल्प पुढे नेले. पूर्वांचल एक्स्प्रेसवे (Purvanchal Expressway) हे त्याचं उदाहरण...

हेही वाचा-  Bipin Rawat Helicopter Crash: 'ती' शेवटची 7 मिनिटं, ज्यांनी बिपीन रावत यांचा घेतला जीव

 - निवडणुकीच्या दोन महिने आधी प्रकल्पासाठी प्रतीकात्मक रक्कम मंजूर करणं आणि टेंडर मंजूर न करणं आणि प्रकल्प अर्ध्यात सोडणं यांमुळे त्यांच्या दाव्यात काही तथ्य उरत नाही. तो फक्त स्टंट होता. आम्ही प्रोजेक्टमध्ये सुधारणा केली. नव्या टेंडर्सद्वारे खर्च कमी केला आणि त्यांची वेळेत अंमलबजावणी केली. त्यामुळे राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या सर्वसमावेशक विकासासाठी आम्ही कसे फोकस्ड आहोत, हे यावरून कळतं. उत्तर प्रदेश पूर्वी अपुऱ्या पायाभूत सुविधांसाठी ओळखलं जायचं. आता देशातलं सर्वांत लांबीचं, सुमारे 1321 किलोमीटर्सचं एक्स्प्रेस-वेचं जाळं बांधून राज्य विकासाच्या दिशेने वेगाने धावत आहे.

- निवडणुकीत ध्रुवीकरण होत आहे का?

- ध्रुवीकरण नक्कीच होत आहे; मात्र ते विकासाच्या बाजूने, उत्तम कायदा-सुव्यवस्थेच्या बाजूने आणि महिलांच्या सुरक्षितेतसाठी. आम्ही राज्याच्या विकासाबद्दल बोलत आहोत. तरुणांना विक्रमी संख्येने रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.

- कथित माफिया मुख्तार अन्सारी आणि आझम खान (Azham Khan) यांच्यासारख्या नेत्यांच्या विरोधात तुमच्या सरकारने केलेल्या कारवाईकडे बरंच लक्ष वेधलं गेलं. अशा बड्या नावांवर कारवाई करण्यामागचं कारण?

- कायदा-सुव्यवस्था राखणं हेच त्यामागचं कारण आहे. आम्ही माफियांना आमच्यासोबत नेत नाही, तर त्यांच्यावर कारवाई करतो. माफियांकडून जप्त केलेल्या जमिनीवर आमचं सरकार गरीब आणि दलितांसाठी घरं बांधणार आहे. असे माफिया आणि गुन्हेगारांना नव्या उत्तर प्रदेशात जागा नाही. विकासासाठी काम करताना माफिया संस्कृती नष्ट करण्याला पर्याय नाही. आतापर्यंत 40हून अधिक माफियांकडून 1800 कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात मुख्तार अन्सारी, आतिक अहमद, विजय मिश्रा, सुंदर भाटी आणि अन्य व्यक्तींचा समावेश आहे. यात कितीही मोठं नाव असलं, तरी कुणालाही सोडलं जाणार नाही.

- प्रियंका गांधी-वड्रा यांचं आव्हान तुमच्यासमोर आहे का? समाजवादी पक्ष म्हणतोय, की उत्तर प्रदेशात भाजप आणि काँग्रेसची फिक्स्ड मॅच आहे.

- चार-पाच वर्षांपूर्वी काँग्रेसशी युती कुणाची होती, हे आपल्या सर्वांनाच चांगलं माहिती आहे. कोविड-19च्या काळात कोणालाही प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात दिसल्या नाहीत. आता त्यांचं इलेक्शन टुरिझम त्यांना उपयोगी ठरणार नाही. जिना आणि ध्रुवीकरणाचे मुद्दे विरोधी पक्षांकडूनच उपस्थित केले जात आहेत.

- लखीमपूर प्रकरणातून असा प्रश्न उपस्थित झाला आहे, की उत्तर प्रदेश सरकार केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे.

- आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही आहोत. ती दुर्दैवी घटना होती. परंतु आम्ही 24 तासांत परिस्थिती सावरण्यात यशस्वी ठरलो. विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून, सुप्रीम कोर्टाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांना नेमलं आहे. आरोपीवर खटला चालवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसानभरपाईही दिली आहे.

हेही वाचा-  CDS Bipin Rawat and Madhulika Rawat : जड अंतकरणाने मुलींनी दिला आईवडिलांना अखेरचा निरोप, पाहा PHOTOS

- तुमचे पूर्वीचे सहकारी ओमप्रकाश राजभर (Omprakash Rajbhar) यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्वांचलमध्ये त्याचा काही फटका बसेल का?

- याची आम्हाला अजिबात चिंता नाही. कारण पूर्वांचल प्रदेशात हा भाजपची स्थिती पूर्वीपासूनच मजबूत आहे. ब्लॅकमेलर व्यक्तीवर आणि जिना भारताचे पंतप्रधान होण्यास लायक होते असे विचार असणाऱ्या व्यक्तीवर उत्तर प्रदेशचे नागरिक कधीच विश्वास ठेवणार नाहीत. पूर्वांचलच्या विकासासाठी राज्य सरकारने बरंच काम केलं आहे. पूर्वीच्या सरकारने तिकडे दुर्लक्ष केलं होतं. दर वर्षी हजारो मुलांचा बळी जाण्यास कारणीभूत ठरलेल्या जापनीज एन्सेफॅलायटिसवर नियंत्रण मिळवण्यात आम्हाला यश मिळालं आहे. गोरखपूरमध्ये एम्सची स्थापना केल्यामुळे समस्त पूर्वांचल विभागाचा फायदा होणार आहे. पूर्वांचल एक्स्प्रेसवेमुळे अर्थव्यवस्थेला, गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. अधिक रोजगारांची निर्मिती झाल्यामुळे स्थलांतर थांबण्यास मदत होणार आहे.

- उत्तर प्रदेश लसीकरणात (Vaccination) आघाडीवर असलं, तरी सर्वांचं लसीकरण पूर्ण होण्यास अद्याप बराच कालावधी आहे. सरकारच्या अव्यवस्थापनामुळे महामारीदरम्यान हजारो जण मरण पावल्याचा आरोप समाजवादी पक्ष करतो. सर्वांचं लसीकरण झाल्याशिवाय लस घेणार नसल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

- विरोधी पक्षातल्या एकाही नेत्याने आणि समाजवादी पक्षाचा नेता तर आझमगडचा खासदार असूनही कोणीही महामारीच्या काळात कोणत्याही ठिकाणी किंवा कुटुंबांना भेट दिलेली नाही. प्रत्यक्ष युद्धभूमीवर न उतरता घरात आरामत बसून हवेत आरोप करणं सोपं आहे. अखिलेश यादव लस न घेऊन आपले डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांचा अपमान करत आहेत. तसंच, निष्पाप व्यक्तींचा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं राजकारणापेक्षा महत्त्वाचं आहे. ते नेमकं कोणतं उदाहरण जनतेपुढे ठेवत आहेत? अशा नेत्यांचा सन्मान करायला नको.

आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे कोविड-19 व्यवस्थापनात उत्तर प्रदेशचं जागतिक पातळीवर कौतुक होत आहे. टेस्टिंग आणि लसीकरणात उत्तर प्रदेश देशात सर्वोच्च स्थानावर आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व पात्र प्रौढांना पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. दररोज रात्री 10 वाजेपर्यंत डोसेस दिले जाणार असून, दररोज 15 ते 20 लाख डोसेस दिले जाणार आहेत. रविवारीही लसीकरण केलं जात आहे. ओमिक्रॉनच्या अनुषंगाने आम्ही नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

हेही वाचा-  Zoom कॉलमध्ये 900 जणांना नोकरीवरून काढणाऱ्या त्या CEO ने अखेर मागितली माफी; म्हणाले...

 - मोफत लसीकरण आणि मोफत रेशन योजना ही या निवडणुकीसाठी तुमची ट्रम्प कार्ड्स (Trump Cards) आहेत का?

- ही ट्रम्प कार्ड्स किंवा निवडणूक अजेंडा नाहीत, तर महामारीच्या काळात सर्वांत जास्त फटका बसलेल्या समाजाच्या गरिबात गरीब घटकांना सरकारने केलेलं साह्य आहे. भाजपचा अजेंडा विकासासाठी, कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी असतो. आम्ही गेल्या साडेचार वर्षांत तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत सुविधा पोहोचवल्या आहेत.

- नया उत्तर प्रदेश (Naya Uttar Pradesh) म्हणजे नेमकं काय?

- नया उत्तर प्रदेश हे व्यवसायसुलभतेसाठी राज्याने केलेल्या लक्षणीय प्रगतीचं निदर्शक आहे. गेल्या साडेचार वर्षांत राज्याने 12 जागांवरून झेप घेऊन दुसरं स्थान पटकावलं आहे. महामारीच्या काळातही व्यवहार थांबले नव्हते, तर या काळात 66 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव राज्याला मिळाले. त्यामुळे जीडीपीच्या बाबतीत उत्तर प्रदेशने गुजरात, तमिळनाडूसारख्या राज्यांना मागे टाकून देशात दुसरं स्थान पटकावलं.

2017पूर्वी राज्यात बेरोजगारी 18 टक्क्यांपेक्षा जास्त होती. सध्या तो दर 4.8 टक्क्यांवर आला आहे. हा दर दिल्ली, केरळ आणि तमिळनाडूच्या तुलनेत खूपच चांगला आहे.

2017पूर्वी राज्यात सुमारे 12 मेडिकल कॉलेजेस होती. आता प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज होत आहे. नऊ नवी मेडिकल कॉलेजेस सुरू झाली असून, 14 मेडिकल कॉलेजेसचं भूमिपूजन झालं आहे. आणखी 16 मेडिकल कॉलेजेस पीपीपी तत्त्वावर उभारली जाणार आहेत.

राज्याच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागाने राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचं इंजिन म्हणून काम केलं आहे. 70 लाख उद्योगांना 2.4 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जं देण्यात आली आहेत. त्यामुळे दोन कोटींहून अधिक रोजगारांची निर्मिती झाली आहे. पारंपरिक कलाकारांसाठी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ही योजना लाभदायक ठरली आहे. त्यामुळे राज्यातील हँडलूम-हँडीक्राफ्ट्स क्षेत्रातल्या निर्यातीत 38 टक्के वाढ झाली आहे.

- कनेक्टिव्हिटीच्या (Connectivity) मुद्द्याबद्दल नव्या काय योजना आहेत?

- 341 किलोमीटर्सचा पूर्वांचल एक्स्प्रेस-वे खुला झाला आहे. 296 किलोमीटर्सचा बुंदेलखंड एक्स्प्रेस-वे, 91 किलोमीटर्सचा गोरखपूर लिंक एक्स्प्रेस-वे आणि 594 किलोमीटर्सचा गंगा एक्स्प्रेस-वे असे आणखी तीन एक्स्प्रेस-वेज आम्ही बांधत आहोत. त्यामुळे टोकांपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. पूर्वी दुर्लक्ष केल्या गेलेल्या पूर्वांचल प्रदेशाला आम्ही पूर्वांचल एक्स्प्रेस-वेच्या माध्यमातून पुन्हा विकासाच्या नकाशावर आणलं आहे. चार मेट्रो प्रकल्प, तसंच केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत नऊ विमानतळ आम्ही सज्ज केले आहेत. अन्य 28 विमानतळांचं काम सुरू आहे. भाओनी धरण प्रकल्पासह अनेक सिंचन प्रकल्पांवरही काम सुरू आहे. त्यामुळे बुंदेलखंडातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य संपून विकास होण्यास मदत होईल.

केंद्र सरकारचे कनेक्टिव्हिटीसाठीचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात राबवले जात आहेत. पाच लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनची अंमलबजावणी अर्थव्यवस्थेला अधिक चालना देणार आहे.

First published:

Tags: Uttar pradesh news, Yogi Aadityanath