माओवादी थिंक टँक : 'कॉलेजचे विद्यार्थी' होते सॉफ्ट टार्गेट

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2018 12:15 PM IST

माओवादी थिंक टँक : 'कॉलेजचे विद्यार्थी' होते सॉफ्ट टार्गेट

विनया देशपांडे. प्रतिनीधी

मुंबई, 01 सप्टेंबर : भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. या सगळ्या दंगलीत माओवादी कनेक्शनच्या संशयावरून 5 जणांना अटक करण्यात आली. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश आहे. यातील गौतम नावलाखा यांनी 13 मार्च 2018 रोजी माओवाद्यांच्या कामाबद्दलचा एक रिपोर्ट जारी केला होता.

गौतम नावलाखा यांनी लिहिलेल्या या अहवालात सरकारच्या विरोधी कारवायांसाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याकरता धोरणांची चर्चा झाली. यात त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्यांच्या संघटनांविषयीचा या रिपोर्ट आहे. याला 'C1' रिपोर्ट असं नाव देण्यात आलं आहे.

या अहवालामध्ये त्यांनी नमुद केलं आहे की, सरकारविरोधी कारवायांसाठी माओवाद्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. शोषित वर्गाच्या संघर्षात माओवादी गटांच्या सहभागाचा उल्लेख करण्यात आला आहे. C-1 माओवादी समितीसाठी 20 गट, 5 मोठ्या संघटना आणि 4 गुप्त संघटना काम करत आहेत.

त्यांच्या या संघटनांना वाढवण्यासाठी तरुण वर्गाला टार्गेट केलं जातं आहे. त्यासाठी शाळा आणि कॉलेजातल्या मुलांचं ब्रेनवॉश करून त्यांना संघटनानांमध्ये समाविष्ट करून घेण्याबद्दलही या अहवालात लिहण्यात आलं आहे. आताची ही तरुण मुलं मोठ्या उत्साहाने माओवादी संघटनांनमध्ये सहभागी होत आहेत आणि काम करत आहेत, त्यामुळे भविष्यात ते या संघटनांना पुढे नेऊ शकतात असंही गौतम यांनी लिहल्याला अहवालात म्हटलं आहे.

तर दुसरीकडे गौतम नवलखा आणि वरवरा राव यांनी लिहिलेली पत्रं आमच्या हाती लागली आहेत. यामध्ये कार्यकर्ते जमा करणे आणि घातपाताचा कट रचण्याबाबत उल्लेख आहेत. कुख्यात माओवादी साईबाबा आणि वकील राम जेठमलानींचाही या पत्रांमध्ये उल्लेख आहे.

पाहूयात सुरेंद्र गडलिंग यांनी वरवरा राव यांना लिहिलेल्या पत्रात काय लिहिलंय.

कॉम्रेड वरवरा राव,

(माओवादी) साईबाबांच्या खटल्यामध्ये आपण अपयशी ठरलो कारण न्यायव्यवस्थेनं शत्रूशी हातमिळवणी केली आहे. नोटबंदीमुळे आम्ही आमच्या गडचिरोली आणि छत्तीसगडमधल्या कॉम्रेड्सना पैसे पाठवू शकलेलो नाही. पण यात माझा दोष नाही. गेल्या 7-8 दिवसांपासून मी पैसे पाठवतो आहे. बस्तरमधल्या हल्ल्यामुळे देशाला आपली ताकद कळली आहे. केंद्र सरकार हादरून गेलं आहे.

मला आशा आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली आपले कॉम्रेड अशाच मोठा कारवाया करत राहतील. बस्तरमध्ये मोठा हल्ला करा हा तुमचा आदेश मी पोहचवला आहे.

आपल्या कॉम्रेड्सच्या माहितीनुसार, उस्सूर, पामेद, एमलागुंडा, पलचल्मा, केरलालपालमध्ये हल्ला करणं सोपं जाईल. कारण या भागांमध्ये केंद्राचा फौजफाटा कमी असतो. कॉम्रेड साईबाबांच्या खटल्याबाबत जोरदार तयारी सुरू आहे. आम्ही राम जेठमलानींशीही बोललो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2018 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close