इंदूर, 13 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची आणखी एक सुसाईट नोट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. त्यात त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता त्यांचे सेवादार विनायक यांच्याकडे देण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहली आहे.
याआधीही त्यांची अजून एक सुसाईड नोट मिळाली होती, कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणालातरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय. असं भय्यूजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
आणि आता त्या सुसाईड नोटचा दुसरा भाग सापडला आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या संपत्तीचे अधिकार हे त्यांच्या सेवादाराकडे दिले आहेत.
आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भैय्यूजी महाराज यांचं पार्थिव त्यांच्या घराकडून आश्रम दाखल झालं आहे.
त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाकरता त्यांच्या सुर्योदय आश्रमात सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत ठेवण्यात येणार आहे. नंतर दुपारी 1.30 वाजता अंत्ययात्रेला सुरवात होणार आहे.
कौटुंबिक सुत्रांच्या माहितीनुसार भैय्यूजी महाराज यांना त्यांची मुलगी मुखाग्नी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भय्यूजी महाराज यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक राजकीय नेते इंदूरमध्ये दाखल झाले आहेत.
========================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा