मराठी बातम्या /बातम्या /देश /

बंद खोलीत माय-लेकींचा सडलेला मृतदेह सापडला; परिसरात उडाली खळबळ

बंद खोलीत माय-लेकींचा सडलेला मृतदेह सापडला; परिसरात उडाली खळबळ

खोलीचं दार उघडताच पोलिसांना माय-लेकींचे मृतदेह पाहून धक्काच बसला

खोलीचं दार उघडताच पोलिसांना माय-लेकींचे मृतदेह पाहून धक्काच बसला

खोलीचं दार उघडताच पोलिसांना माय-लेकींचे मृतदेह पाहून धक्काच बसला

  • Published by:  Meenal Gangurde

फारुखाबाद, 21 जुलै : उत्तर प्रदेशातील फारुखाबाद शहरातील पोलीस हद्दीमध्ये मंगळवारी एक धक्कादायक कृत्य समोर आलं. येथे एका घरात माय-लेकीचा मृतदेह सापडला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

माय-लेकीचा मृतदेह सापडल्यानंतर गावात भीती पसरली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाल गेट घटिया घाट रोडजवळील कबाडा गल्लीत दुर्गंधी पसरली होती. मृतदेह सापडल्याच्या शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांनी कळवलं. पोलिसांनी खोलीचं दार उघताच त्यांना धक्काच बसला. तेथे द्वारिका प्रसाद यांची पत्नी रामकली (60) आणि त्यांची मुलगी (35) याचा मृतदेह पडला होता. तो मृतदेह पूर्णपणे सडला होता.

हे वाचा-कोरोनामुळे अख्खं कुटुंब उद्धवस्त, आईनंतर 5 ही मुलांचा मृत्यू

परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसा, या घरात नेहमीच वाद होत असे. आई-लेक आणि मुलामध्ये नेहमीचं भांडणं होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून घरात कोणत्याच हालचाली दिसत नव्हत्या. त्यांचा मुलगा लालू याने सांगितल्यानंतर माय-लेकींनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

हे वाचा-देशातील मृतांचा आकडा 28 हजार पार, 24 तासांत नवीन रुग्णांची संख्या झाली कमी

त्यानुसार त्यांचा वाद कोर्टात गेला होता. पोलिसांतील वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार दोघींचे शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच नेमका खुलासा करण्यात येईल. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी ही हत्या असल्याचे सांगितले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

First published: