मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं

डिझेलचे दर वाढणार आहेत. केंद्र सरकारकडून लिटरमागे उत्पादन शुल्क 03 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. उत्पादन शुल्क वाढल्यानं पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार आहेत. केंद्र सरकारकडून लिटरमागे उत्पादन शुल्क 03 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे.

इंडियन ऑईलने आपल्या वेबसाईटवर जारी केलेले दर पुढील प्रमाणे आहेत.

दिल्ली- पेट्रोल- 69.78

मुंबई- पेट्रोल- 75.57

कोलकाता- पेट्रोल- 72.57

चेन्नई- पेट्रोल- 72.57

सकाळी 6 वाजता किंमतींमध्ये होतो बदल

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

First published: March 14, 2020, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading