पुलवामा,16 मे: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. तर चकमकीत एक जवान शहीद तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नौशेरा, पुंछ आणि पुलवामा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्यानं कुरापती सुरू आहेत. पुलवामा सेक्टरमध्ये गुरूवारी सकाळी भारतीय सुरक्षा दलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. तर पुलवामा सेक्टरमध्ये आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्यानं सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
ट्विटरवरील EXIT POLL बाबतचे ट्वीट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. गुरुवारी सकाळी जवानांनी दहसतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यात चकमक उडाली आणि त्यात 3 दहशतवादी ठार झाले. आणखी दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहांच्या रॅलीतील हिंसाचाराबद्दल तृणमूलचा मोठा खुलासा, केला हा VIDEO प्रसिद्ध