मराठी बातम्या /बातम्या /देश /माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून 1.17 लाख रुपये लंपास

माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून 1.17 लाख रुपये लंपास

Former MLA driver looted by goons : डोळ्यात मिरची पूड टाकून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले आहेत.

Former MLA driver looted by goons : डोळ्यात मिरची पूड टाकून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले आहेत.

Former MLA driver looted by goons : डोळ्यात मिरची पूड टाकून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले आहेत.

हरियाणा, 25 डिसेंबर : माजी आमदाराच्या ड्रायव्हरकडून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास (driver looted by goons) केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणाच्या पानिपत (Panipat Haryana) शहराच्या माजी आमदार रोहिता रेवडी यांच्या गाडीचा माजी ड्रायव्हरला चोरट्यांनी लुटलं आहे. ड्रायव्हर करण याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखांहून अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.

पीडित करण याने सांगितले की, तो छजपूर येथील निवासी आहे. रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या गावाला जात होता. त्यावेळी धान्य गोदामाच्या जवळ येताच नंबर नसलेल्या बाईकवर आलेल्या तरुणांनी त्याच्या अंगावर मिरची पूड टाकली. यावेळी करण याच्या डोळ्यातही मिरची पूड गेली. त्यावेळी चोरट्यांनी करणच्या जवळील 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

यावेळी करण याने चोरट्यांना विरोध केला तसेच पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी पुन्हा करणच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्याला ढकलून दिले. यावेळी करण खाली जमिनीवर कोसळला.

वाचा : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळले 3 लाख; डाव उलटला अन्...

तिघांनी मारहाण करुन लुटले

पीडित करण याने सांगितले की, या घटनेवेळी तेथे दुसरी बाईक आली आणि त्यावर तिघेजण बसले होते. एकूण पाच जणांनी मला पकडले आणि मारहाण केली. आरोपींनी माझ्या जवळील मोबाइल फोनही हिसकावला मात्र, तो तेथेच टाकून आरोपींनी पळ काढला. करणने सांगितले की, हे पैसे त्याने आपल्या एका मित्राकडून उधार घेतले होते.

सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी एसएचओ अतार सिंह यांनी सांगितले की, छाजपूर खुर्द येथे राहणारा करण आपल्या घरी जात होता. त्यावेळी दोन बाईक्सवर आलेल्या आरोपींनी त्याला रोखले आणि त्याच्याकडील 1 लाख 17 हजारांची रोकड लुटली. आरोपींनी करणच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

वाचा : भाकर मागताच संतापली सुन, रागाच्या भरात सासूचा मोडला हात

गोळीबार आणि चाकूने वार करून सराफाला लुटले, कामगाराचा मृत्यू

वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव शहरात एका ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला करून लुटण्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून आणि चाकूने वार करून ज्वेलर्स मालकाला लुटले आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्स हे दुकान बंद करून योगेश अंजनकर आणि त्यांचा सहकारी रवी वाळेकर हे दोघे रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घरी जात होते.

योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये योगेश अंजनकर यांचा सहकारी रवी वाळेकर यांचा चाकू व गोळी लागून मृत्यू झाला. तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Haryana