S M L

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जीं यांचं निधन

जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील 'बेले व्ह्यू' रूग्णालयात दाखल करण्यात आले होते

Updated On: Aug 13, 2018 09:20 AM IST

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जीं यांचं निधन

कोलकाता, १३ ऑगस्ट- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज १३ ऑगस्टला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कोलकाता येथील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना १० ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  याच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील 'बेले व्ह्यू' रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्ष २०१४ मध्येही त्यांना असाच त्रास जाणवला होता.

सोमनाथ चॅटर्जी यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र आहेत. चॅटर्जी यांनी नुकतीच पंचायत निवडणुकांवरून राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत पश्चिम बंगालच्या निवडणुकीत इतका हिंसाचार पाहिला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. दहा वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले चॅटर्जी यांनी १९६८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. १९७१ मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते.

 

सोमनाथ चॅटर्जीं यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास..

- 25 जुलै 1929 साली जन्म

Loading...
Loading...

- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते

- 1971 साली पश्चिम बंगालच्या बरद्वान मतदारसंघातून ते विजयी झाले

- 1977, 1980 लोकसभा निवडणूकीत जादवपूर मतदारसंघातून ते विजयी झाले

- 1984 लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींकडून त्यांचा पराभव झाला होता

- 1985 बोलपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले

- 1989 पासून सलग सहा लोकसभा निवडणुकांमध्ये ते विजयी झाले

- 2004 ते 2009 दरम्यान 14 व्या लोकसभेचे सभापती

- जुलै 2008 - मनमोहन सिंह सरकार विश्वासदर्शक ठरावादरम्यान लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

- कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाल्यानं पक्षातून हकालपट्टी

- 2009 मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 09:20 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close