मराठी बातम्या /बातम्या /देश /

राजकारणाला रामराम ठोकणारे Ex IAS अधिकारी होणार जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार?

राजकारणाला रामराम ठोकणारे Ex IAS अधिकारी होणार जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार?

त्यामुळे आता फैजल यांची सरकारी नोकरीतली ही सेकंड इनिंग कशी ठरेल आणि त्याचा काश्मीर आणि केंद्र सरकार या संबंधांवर कसा परिणाम होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

श्रीनगर, 9 ऑक्टोबर : गेल्या वर्षी नागरी सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक झाल्यानंतर माजी आयएएस अधिकारी शाह फैजल चर्चेत (Former IAS officer Shah Faisal) आले होते. त्या प्रकरणानंतर त्यांनी राजकारण सोडल्याचं जाहीर केलं होतं; मात्र आता पुन्हा त्यांचं नाव माध्यमांमध्ये झळकतं आहे. याला कारण म्हणजे, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या सल्लागारपदी (Advisor to J&K LG Manoj Sinha) शाह फैजल यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनातल्या काही उच्चस्तरीय सूत्रांनी सीएनएन-न्यूज18ला याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं (Terrorist attacks in Jammu and Kashmir) प्रमाण वाढलं आहे. दोन दिवसांपूर्वीच एका शाळेवर गोळीबार करून मुख्याध्यापक आणि शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. गेल्या पाच दिवसांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी चार हे अल्पसंख्याक समाजातले (Minorities in Jammu and Kashmir) होते. काश्मीर खोऱ्यात अशा घटना वाढत असतानाच फैझल यांची नियुक्ती केली जात असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

शाह फैजल यांनी 2009 मध्ये झालेल्या आयएएस परीक्षेत जम्मू-काश्मीरमधून (J&K IAS topper Shah Faisal) प्रथम क्रमांक मिळवला होता. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच होते. काश्मीर खोऱ्यामध्ये ते एक यूथ आयकॉन होते. त्यानंतर दहा वर्षं अधिकारी म्हणून काम केल्यानंतर, 2019 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी काश्मीरमध्ये एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली होती. जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (JKPM) असं त्यांच्या पक्षाचं नाव होतं. त्यानंतर गेल्याच वर्षी त्यांनी राजकारणातून संन्यास (Shah Faisal Quits politics) घेतल्यामुळे पुन्हा ते सरकारी नोकरीत रुजू होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

हे ही वाचा-रेल्वे स्टेशन, चहा आणि अमित शाह! राजकीय वर्तुळात पुन्हा ‘चाय पे चर्चा’ सुरू

दरम्यान, 2019मध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला फैजल याने मोठा विरोध केला होता. त्यानंतर त्यांना ऑगस्टमध्ये दिल्ली विमानतळावरून अटक (Shah Faisal on Article 370) करण्यात आली होती. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात (Shah Faisal detained) ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत (Public Safety Act) गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर जूनमध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती.

फैजल यांचा राजकीय प्रवास संपला असला, तरी काश्मीर खोऱ्यातला त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांना स्थानिकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेच त्याची सल्लागारपदी निवड करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. फैजलसारखी लोकप्रिय व्यक्ती सरकारकडे असेल, तर केंद्र सरकार आणि स्थानिक नागरिक यांच्यातला संवाद (Political Dialogue between Kashmir Youths and Center) अधिक चांगला होण्याची शक्यता आहे. “ही एका नव्या राजकीय संवादाची नांदी ठरेल” असं एका सरकारी सूत्रानं सांगितलं.

त्यामुळे आता फैजल यांची सरकारी नोकरीतली ही सेकंड इनिंग कशी ठरेल आणि त्याचा काश्मीर आणि केंद्र सरकार या संबंधांवर कसा परिणाम होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Ias officer, Jammu and kashmir, Terrorist attack