ब्रेकअपचे साईड इफेक्ट्स : EX गर्लफ्रेंडने दिला बॉयफ्रेंडला चोप; Slap Day लाच आली ही बातमी

ब्रेकअपचे साईड इफेक्ट्स : EX गर्लफ्रेंडने दिला बॉयफ्रेंडला चोप; Slap Day लाच आली ही बातमी

वॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशीच एक्स गर्लफ्रेंडने एका तरुणाला भर रस्त्यात चोप दिला. प्रेमाच्या बदलत्या रंगाने उपस्थित मात्र हैराण झाले.

  • Share this:

पाटणा, 15 फेब्रुवारी -   'हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहिं सकते तुम्हारे बिना' हे हिंदी सिनेमातलं गाणं प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाने ऐकलं असेल, पाहिलं असेल आणि प्रेमाच्या महासागरात तरंगतना गायलंही असेल. मात्र या प्रेमीयुगुलांचा ब्रेकअप होतो तेव्हा प्रेमाचा कसा तमाशा होता याचा प्रत्येक वॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी आला. 14 फेब्रुवारीला वॅलेंटाईन डे (Valentines Day) काल साजरा झाला. या दिवशी प्रेमी युगुलं (Lovers) आपलं एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. एकमेकांसोबत जगण्या-मरणाच्या आणाभाकाही घेतात. त्या दोघांनीही अशा शपथा कधी तरी घेतल्याच असतील. मात्र शनिवारी या प्रेमीयुगुलाला या सगळ्याचा विसर पडला आणि त्यांनी भर रस्त्यात मोठा तमाशा केला. या तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला भर रस्त्यात चांगलाच चोप दिला.  तो तरुण पोलिसांच्या भीतीने आणि मोठा वाद होण्याच्या भीतीने हे सगळं सहन करत होता. या सगळ्या गदारोळात त्या तरुणानेही आपल्या एक्स गर्लफ्रेंडला एवढ्या शिव्या दिल्या की ऐकणारेही अवाक होऊन बघत राहिले.

बिहारची राजधानी पाटण्याच्या वर्दळीच्या बोरिंग रोडवर ही घटना घडली. व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी काही जण स्लॅप डे साजरा करतात. ही घटना नेमकी स्लॅप डेच्या दिवशीच झाली. शनिवारी सकाळी साधारण साडे अकरा वाजता या प्रेमीयुगुलांचं भर रस्त्यात भांडण झालं. आणि जमलेले लोक प्रेमाच्या या बदलत्या अँगलबाबत एकमेकांशी चर्चा करू लागले.

वाचा - अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला, काय आहे सत्य?

या तरुणीकडून मार खाल्ल्यानंतरही जमलेली गर्दी पाहून या तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर हात उचलला नाही. तर आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून आपण आपल्या प्रेमाला तिलांजली दिल्याचं या मार खाणाऱ्या तरुणानं म्हटलं आहे. मात्र शनिवारी झालेला वाद हा या तरुणीच्या रागातून झाल्याचं कळतंय. या तरुणीचा आरोप आहे की, "तिचा हा एक्स बॉयफ्रेंड त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये तिच्या विषयी अपप्रचार करून बदनामी करत होता."

प्रेमाच्या बदलत्या रंगाने लोक हैराण

प्रेमाच्या या बदलत्या रंगाने उपस्थित लोकही हैराण झाले. जिथं प्रेमामध्ये प्रियकर-प्रेयसी एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असतात. तिथं आजच्या आधुनिक युगात प्रेमाचं झटपट बदलतं स्वरुप काहीसं असंच आहे.

एक्स बॉयफ्रेंड आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर अनेक आरोप करतोय आणि पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचंही बोलतो आहे. एकंदरितच दोघेही प्रेमाच्या महासागरात कधी काळी आखंड बुडाले असतील मात्र त्यांना याची जराही आठवण राहिली नाही आणि त्यांचं प्रेम भर रस्त्यात बदनाम झालं.

---------------------

मोबाइलवर बोलण्यासाठी मोजावी लागणार अधिक रक्कम, हे आहे कारण

महाराष्ट्रात भाजपला बसू शकतो आणखी एक धक्का, खासदार कमी होणार?

First published: February 15, 2020, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading