नथुराम गोडसेला बंदूक पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता, भाजप खासदाराचा खळबळजनक खुलासा

नथुराम गोडसेला बंदूक पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता, भाजप खासदाराचा खळबळजनक खुलासा

भाजपच्या खासदारांनी बापूंच्या हत्येचा पुन्हा नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मृत्यूबाबत आणि त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. महात्मा गांधीजींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का केले नाही? भाजपच्या खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बापूंच्या हत्येचा पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. महात्मा गांधींच्या हत्येबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले आहेत.  याशिवाय ते पुढे जाऊन असंही म्हणाले की, महात्मा गांधींना नथुराम गोडसेने गोळ्या घातल्या होत्या ही बाब पूर्णत: सिद्ध करता येऊ शकत नाही.

स्वामी यांनी नव्याने केलेल्या ट्विटमध्ये आणखी एक खळबळजनक माहिती सांगितली आहे. गोडसेला बंदूक देणारा आरोपी बडगे याने कोर्टात असं विधान केलं की, तो हिंदू महासभेत रुजू होण्यापूर्वी कॉग्रेसचा कार्यकर्ता होता.

स्वामींनी ट्विट केलं आहे की, पहिला प्रश्न गांधींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन किंवा ऑटोप्सी का केली गेली नाही? दुसरं आभा आणि मनूसोबत प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात त्यांची चौकशी का केली गेली नाही? तिसरं म्हणजे गोडसेंच्या बंदूकीत किती रिकामी चेम्बर होते? आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची गरज आहे.

स्वामींनी आणखी एक ट्विट करुन सांगितले, की असोसिएट प्रेस इंटरनॅशनल जर्नलिस्टमधील पान क्र. 52 वरील वक्तव्य – त्यांनी 5.05 PM वाजता चार शॉर्ट ऐकले. (तीन नाही, जसं सरकारी वकिलाने नंतर कोर्टात सांगितले) गोडसेने दाखविले की त्याने केवळ 2 फायर केले. त्याच एपीआय पत्रकारने सांगितले की 5.40 PM वाजता बिर्ला हाऊसमध्ये गांधींना मृत घोषित करण्यात आले. म्हणजे ते 35 मिनिटांपर्यंत जिवंत होते.

सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये गांधी हत्येच्या चौकशीची मागणी करणारी एक याचिका फेटाळली होती. ही याचिका 2017 मध्ये एक आयटी प्रोफेशनल डॉ. पंकज कुमुदचंद्र फडनीद्वारा दाखल करण्यात आली होती. याचितेच म्हटले होते, की हत्याच्या चौकशीची गरज होती. कारण या बाबतील अस्पष्टता होती की, गांधी यांची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेनी चौथी गोळी चालवली होती?

याचिकेत हे देखील म्हटले होते की, गोडसे आणि नारायण दत्तात्रेय आपटे यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली होती. यानंतर ठीक 71 दिवसांनंतर 26 जानेवारी 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालय अस्तित्वत आले होते. याचा अर्थ असा आहे की मारेकऱ्याच्या कुटुंबीयांना पूर्व पंजाबमधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याची संधी मिळाली नव्हती. यानुसार याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, गांधी हत्येच्या सुनावणीला अद्यापपर्यंत कायदेशीररित्या पूर्ण करण्याच आलेले नाही.

First Published: Feb 17, 2020 02:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading